ETV Bharat / city

झिका व्हायरसचा धोका : डेंग्यू आणि चिकनगुनिया पसरवणारा डास करतोय 'झिका'चा प्रसार

author img

By

Published : Jul 9, 2021, 8:35 PM IST

Updated : Jul 14, 2021, 9:33 AM IST

झिका व्हायरस हा माणसांमध्ये होणारा गंभीर असा साथीचा आजार आहे. याचा प्रसार हा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे डासांच्या माध्यमातून होतो. डेंग्यू आणि चिकन गुनियाला कारणीभूत असलेल्या एडीसइजिप्ती हाच डास झिका व्हायरस पसराव्याला कारणीभूत आहे.

झिका व्हायरस
झिका व्हायरस

पुणे - केरळमध्ये झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. केरळमध्ये यावर्षीचा हा पहिला रुग्ण आहे. डासाच्या माध्यमातून होणार हा झिका व्हायरस काय आहे. याने काय होऊ शकते. हा आजार किती गंभीर आहे. याची लक्षणे काय आहे .यामुळे काय होऊ शकते. याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी माहिती दिली आहे.

डेंग्यू आणि चिकनगुनिया पसरवणारा डास करतोय 'झिका'चा प्रसार

झिका व्हायरस गंभीर साथीचा आजार

झिका व्हायरस हा माणसांमध्ये होणारा गंभीर असा साथीचा आजार आहे. याचा प्रसार हा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे डासांच्या माध्यमातून होतो. डेंग्यू आणि चिकन गुनियाला कारणीभूत असलेल्या एंडीसइजिप्ती हाच डास झिका व्हायरस पसराव्याला कारणीभूत आहे. या डासाच्या चावानंतर झिका व्हायरस त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात आणि हे विषाणू शरिरात प्रवेश केल्यानंतर तीन ते दहा दिवसात त्या व्यक्तीला या आजाराची लक्षणे दिसतात. यात कमालीचा ताप येणे, सर्दी होणे, सर्व अंग दुखणे अशी लक्षणे दिसतात, अशी माहिती यावेळी डॉ. भोंडवे यांनी दिली.

80 टक्के रुग्ण हे सर्वसाधारण औषधांनी बरे होतात

या आजारात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीला हा झिका व्हायरस झाला अश्या व्यक्तीच्या शरीरातील महत्त्वाचं भाग असलेल्या फुफ्फुस, यकृता आणि मेंदूला सूज येते. आणि तो व्यक्ती गंभीरही होऊ शकतो. विशेषतः या आजारात 80 टक्के रुग्ण हे सर्वसाधारण औषधांनी बरे होतात. तर 20 टक्के रुग्ण हे गंभीर होतात. या व्हायरससाठी कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. परंतु हा आजार गर्भवती महिला आणि लहान मुलांना गंभीर ठरू शकतो. गर्भवती महिलांमधील बाळ हे मृत जन्मू शकते. बाळ जन्माला आला तर मेंदूची वाढ होत नाही. तसेच आयुष्यभर तो बाळ अपंग असू शकतो.

विविध देशात या व्हायरसची येऊन गेलीय साथ

2015 मध्ये ब्राझीलमध्ये या आजाराची मोठी साथ आली होती. काही हजार व्यक्ती यात बाधित झाले होते. 1947 मध्ये युगांडा येथे रुग्ण सापडला. यानंतर दक्षिण अमेरिका तसेच आफ्रिका येथील विविध देशात या आजाराचे साथी येऊन गेल्या आहेत. 2018 मध्ये राजस्थान येथे या आजाराचे काही रुग्ण सापडले होते. सध्या केरळमध्ये या आजाराचे रुग्ण सापडत आहे.

झिका व्हायरचा इतिहास

1940 मध्ये झीका व्हायरस सगळ्यात आधी युगांडामध्ये आढळला होता. त्यानंतर हा खूप वेगाने पसरला. अफ्रिकेतील अनेक भागात पसरून अनेकांवर हल्ला केला. नंतर हा दक्षिण प्रशांत आणि आशियाच्या काही देशांमधून लॅटिन अमेरिकेपर्यंत पोहचला. ब्राझीलमध्ये जेव्हा हा भरपूर प्रमाणात पसरला. तेव्हा काही शास्त्रज्ञांनी अंदाजा लावला की, 2014 च्या फुटबॉल वर्ल्ड कपदरम्यान आशिया आणि दक्षिण प्रशांतकडून हा आला असावा. पण यासंदर्भात अद्याप खात्री होऊ शकली नाही.

काय आहेत लक्षणे

हा व्हायरस एंडीज इजिप्टी नावाच्या डासांमुळे पसरतो. हे तेच डास आहेत, ज्यांच्यामुळे कावीळ, डेंगू आणि चिकुनगुनियासारखे विषाणुजन्य आजर होतात. झीका संक्रमित आईकडून आपल्या नवजात बाळात जातो. हा व्हायरस ब्लड ट्रांसफ्यूजन आणि यौन संबंधामधूनही पसरतो. झीकाचे नेमके लक्षण अद्याप समोर न आल्याने याला ओळखणे थोडे अवघड असते. पण असे सांगितले जाते की, डास चावल्यानंतर, ताप रैशेज, डोके दुखी आणि सांधेदुखी होते.

काय समस्या होते

यामुळे मायक्रोसेफली नावाचा आजार होतो. माइक्रोसेफली एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे. याने मुलांचे डोके लहान राहते आणि मेंदूचा विकास होत नाही. यामुळे जीवालाही धोका निर्माण होतो. यातून वाचलेल्या मुलांना आयुष्यभर मेंदूसंबंधी विकार होतात.

Last Updated :Jul 14, 2021, 9:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.