ETV Bharat / city

Shashikant Ghorpade : पणन सह संचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह सापडला; एनडीआरएफच्या जवानांना यश

author img

By

Published : Oct 14, 2022, 1:37 PM IST

Shashikant Ghorpade
शशिकांत घोरपडे

पुण्याजवळील भोर मध्ये बेपत्ता झालेले पणनचे सह संचालक शशिकांत घोरपडें ( Shashikant Ghorpade CoDirector of Marketing ) यांचा मृतदेह सापडला आहे. नीरा नदीपात्रात मृतदेह सापडला आहे.

पुणे : पुण्याजवळील भोर मध्ये बेपत्ता झालेले पणनचे सह संचालक शशिकांत घोरपडें ( Shashikant Ghorpade CoDirector of Marketing ) यांचा मृतदेह सापडला आहे. नीरा नदीपात्रात मृतदेह सापडला आहे. बेपत्ता झाल्यावर त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन आणि त्यांची कार पुणे सातारा महामार्गावरील सारोळे येथील नीरा नदीच्या पुलाशेजारी आढळली होती. त्यांनतर cctv फुटेजच्या आधारे शोध सुरू करण्यात आला होता. नीरा नदी पात्रात त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. त्याच्या आधारे कालपासून NDRF आणि स्थानिक रेस्क्यू टीम यांच्याकडून त्यांचा शोध नीरा नदी पात्रात घेण्यातं येत होता. अखेर दुसऱ्या दिवशी 5 तास शोधकार्य केल्यानंतर, त्यांचा मृतदेह शोधण्यात NDRF च्या जवानांना यश आल आहे.त्यांनी आत्महत्या का केली याच कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे .


मिसिंग केस दाखल करण्यात आलेली : पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे हे बेपत्ता झाले होते. त्या संदर्भातली मिसिंग केस ही दाखल करण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांचे शेवटचे लोकेशन पोलिसांना भोरजवळील नीरा नदी मध्ये सापडलं होतं. त्यानंतर पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. की त्यांनी आत्महत्या केली असावी आणि त्यामुळे पोलिसाने आणि इंडिया रेपच्या जवानांना नदीमध्ये शोधकारी सुरू केलं होतं अखेर त्यांचा मृतदेह सापडलेला आहे. एनडीआरएफच्या जवानांना प्रत्यय बाहेर काढण्यात यश आलेला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही परंतु एक प्रशासकीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे अनेक चर्चा होत्या त्याचा तपास आता पुढील तपास पोलीस करत आहेत.

शशिकांत घोरपडे

बेपत्ता पणनचे सह संचालक शशिकांत घोरपडें यांचा मृतदेह सापडला : नीरा नीरा नदीपात्रात कालपासून शोध सुरू होता. पुणे येथील पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी घरातून बेपत्ता होऊन शिरवळ जवळील नीरा नदीत उडी घेतली होती.अशी फिर्याद शिरवळ येथील पोलीस ठाण्यात त्यांच्या पुण्यातील नातेवाइकाने दिली होती.त्यानंतर पोलिसांनी तत्काळ रेस्क्यू पथकाच्या मदतीने नदीपात्रात सायंकाळपर्यंत शोधकार्य केले. मात्र, अंधार पडल्याने हे काम थांबविण्यात आले होते सकाळी पुन्हा एनडीआरएफच्या माध्यमातून शोध सुरू होता आणि अखेर बेपत्ता पणनचे सह संचालक शशिकांत घोरपडें यांचा मृतदेह नीरा नदीत सापडला आहे.

एनडीआरएफच्या जवानांना यश : घोरपडे हे बेपत्ता झाल्यावर त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन आणि त्यांची कार पुणे सातारा महामार्गावरील सारोळे येथील नीरा नदीच्या पुलाशेजारी आढळली होती. त्यांनतर सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू करण्यात आला होता. नीरा नदी पात्रात त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. त्याच्या आधारे कालपासून एनडीआरएफ आणि स्थानिक रेस्क्यू टीम यांच्याकडून त्यांचा शोध नीरा नदी पात्रात घेण्यातं येत होता. अखेर दुसऱ्या दिवशी 5 तास शोधकार्य केल्यानंतर, त्यांचा मृतदेह शोधण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आल आहे. घोरपडे यांनी आत्महत्या का केली याच कारण मात्र अद्याप अस्पष्टयं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.