ETV Bharat / city

Sharad Pawar In Pune : ...म्हणून शरद पवारांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे बाहेरुन दर्शन

author img

By

Published : May 27, 2022, 5:41 PM IST

Sharad Pawar visited Dagdusheth Halwai Ganpati
Sharad Pawar visited Dagdusheth Halwai Ganpati

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी आज ( 27 मे ) दगडूशेठ गणपतीचे दर्शन ( Sharad Pawar Visited Dagdusheth Halwai Ganpati ) घेतले. मात्र, त्यांनी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले आहे.

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी आज ( 27 मे ) दगडूशेठ गणपतीचे दर्शन ( Sharad Pawar Visited Dagdusheth Halwai Ganpati ) घेतले. मात्र, त्यांनी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले आहे. 'मी आज मांसाहार केल्याने मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही,' असं शरद पवार म्हणाले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

शरद पवार आज पुण्यातील श्रीमंत दगडूनशेठ हलवाई गणपती मंदिर आणि भिडे वाड्याला भेट देणार होते. त्याप्रमाणे सुरुवातील त्यांनी भिडे वाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून भिडे वाड्याबाबत माहिती जाणून घेतली. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेरुन दर्शन घेतले.

'मांसाहार केल्याने बाहेरून दर्शन' - शरद पवार यांनी बाहेरून दर्शन का केल्याचे विचारला असता राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, 'मी आज मांसाहार केल्याने मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही,' असे शरद पवार यांनी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

शरद पवारांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

'मंदिरात का नाही आले हा त्यांचा प्रश्न' - शरद पवारांनी दगडूशेठ मंदिराला भेट दिल्यानंतर खजिनदार महेश सुर्यवंशी यांनी म्हटले की, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या दर्शनाला दररोज 30 ते 30 हजार भाविक येतात. परंतु, महिलांच्या अत्यावश्यक गोष्टींची सोय नव्हती. मंदिराच्या लगत शासकीय जागा आहे आणि तिथे ही व्यवस्था होऊ शकते यासाठी ट्रस्टच्यावतीने शरद पवार यांची काल भेट घेतली होती. त्यामुळे ते आज येऊन त्यांनी त्याची पाहणी देखील केली. मंदिरात का नाही आले हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्याच कारण ही त्यांनी दिलं आहे. मंदिरातील कळसाचे दर्शन घेतलं काय ? की रस्त्यावरून दर्शन घेतलं काय. आम्ही प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करतो. आमच्यासाठी भक्तांचे प्रश्न सोडवणे आणि ते त्यासाठी आले हे महत्त्वाचं आहे, असे सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Aryan Khan Drug Case : पुराव्या अभावी तक्रार नाही; बादशाहचा मुलगा निर्दोष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.