ETV Bharat / city

Sharad Pawar on fadnavis : सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात, सगळेच पवार नसतात.. शरद पवारांचा फडणवीस यांना टोला

author img

By

Published : Apr 25, 2022, 2:37 PM IST

Sharad Pawar on president rule
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

राज्यात राष्ट्रपती राजवट ( Sharad Pawar on president rule ) लागू करता येईल अशी परिस्थिती आहे, असे भाजपच्यावतीने सांगण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar on fadnavis in pune ) यांना विचारले असता, हे खरे आहे की सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. हा काही नवीन भाग नाही. सगळेच शरद पवार नसतात, असा टोला शरद पवार ( Sharad Pawar news on fadnavis in pune ) यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

पुणे - राज्यात राष्ट्रपती राजवट ( Sharad Pawar on president rule ) लागू करता येईल अशी परिस्थिती आहे, असे भाजपच्यावतीने सांगण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar comment on fadnavis in pune ) यांना विचारले असता, हे खरे आहे की सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. हा काही नवीन भाग नाही. सगळेच शरद पवार नसतात. माझी कित्येकदा सरकार गेली. पण, मी कधीही अस्वस्थ झालो नाही, असा टोला शरद पवार ( Sharad Pawar news on fadnavis in pune ) यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

हेही वाचा - Dr. Madhav Godbole dies : निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे निधन

सत्ता येते जाते, पण आपण इतके अस्वस्थ ( Sharad Pawar news pune ) होण्याची गरज नाही. हल्ली काही लोक खूपच अस्वस्थ होतात. पण, मी त्यांना दोष देणार नाही. कारण निवडणूक येण्याच्या आधीच मी येणार येणार असल्याच्या घोषणा दिल्या आणि ते घडू शकले नाही म्हणून अस्वस्थता येते, असा टोला पवार यांनी यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

सिंबायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सिंबायोसिसचे संस्थापक डॉ.शां.ब. मुजुमदार, संजीवनी शां. मुजुमदार आदी उपस्थित होते.

निवडणुकीचे निकाल काय लागतात हे कोल्हापूरने सांगितले - भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहखात्याला राज्यातील परिस्थितीबाबत भेट घेऊन सांगणार यावर पवार यांना विचारले असता, अस्वस्थ असणाऱ्या लोकांनी कुठले कुठले मार्ग आपल्याला उपलब्ध आहे याच्या खोलात ते जाणार. त्याचा विचार करण्याची काही गरज नाही. राष्ट्रपती राजवटीची चर्चा होत असते, पण तसे होत नाही. निवडणूक घेण्याची वेळ आली तर निवडणुकीचे निकाल काय लागतात हे कोल्हापूरने सांगितले आहे, असे देखील यावेळी पवार यांनी सांगितले.

सगळेच पवार नसतात - 1980 साली माझे सरकार बरखास्त केले ही बातमी जेव्हा मला रात्री कळाली तेव्हा मी घर बदलले आणि दुसऱ्या दिवशी वानखेडे स्टेडियम येथे भारत विरुद्ध इंग्लंड मॅच बघितली. आणि दिवसभर मॅच एन्जॉय केली, असे देखील पवार म्हणाले.

भोंग्यांच्या बाबतीत राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, चांगले आहे. सर्वपक्षीय लोकांबरोबर बैठक होईल. काहीतरी यातून चांगले निघेल, असे देखील यावेळी पवार म्हणाले.

हेही वाचा - Murder over washing utensils in pune : पुण्यात भांडी घासण्याच्या कारणातून वाद, चाकूने भोसकून रूममेटचा खून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.