ETV Bharat / city

Pune Vaccine Second Dose : 3 लाख पुणेकरांची लसीच्या दुसऱ्या डोससाठी टाळाटाळ

author img

By

Published : Dec 15, 2021, 6:30 PM IST

Updated : Dec 15, 2021, 6:59 PM IST

Jitendra Awhad Attack on Central Govt
जितेंद्र आव्हाड

पुणे जिल्ह्यात 'हर घर दस्तक' मोहिमेअंतर्गत ( har ghar dastak campaign in pune )आतापर्यंत १३ लाख ६० हजार ३७० जणांना घरी जाऊन लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ग्रामीणमध्ये सहा लाख लसीकरण ( Pune Vaccine Second Dose ) झाले. सध्या नव्याने आलेल्या कोरोनाच्या व्हेरियंटमुळे लसीकरण महत्त्वाचे असून, त्यासाठी अधिक भर दिला जात आहे.

पुणे - केंद्र आणि राज्य सरकारने लसीकरण पूर्ण करण्याविषयी आदेश दिले आहेत. यासाठी हर घर दस्तक' मोहीम सुरू केली आहे. त्या माध्यमातून समुपदेशन केले जात आहे. यासाठी महापालिकेने पथकेही नेमली असून, ते घरोघरी जाऊन किती डोस झाले? किंवा कोणी घेतले की नाही, याची माहिती गोळा करत आहेत. याच माध्यमातून गोळा केलेल्या माहितीत सुमारे तीन लाख जणांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसून ( Pune Vaccine Second Dose ) आले आहे.

आतापर्यंत १३ लाख ६० हजार ३७० जणांना घरी जावून लस -

जिल्ह्यात 'हर घर दस्तक' मोहिमेअंतर्गत ( har ghar dastak campaign in pune ) आतापर्यंत १३ लाख ६० हजार ३७० जणांना घरी जाऊन लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ग्रामीणमध्ये सहा लाख लसीकरण झाले. सध्या नव्याने आलेल्या कोरोनाच्या व्हेरियंटमुळे लसीकरण महत्त्वाचे असून, त्यासाठी अधिक भर दिला जात आहे.

कुठे किती झाले लसीकरण -

'हर घर दस्तक' मोहिमेअंतर्गत पुणे शहरात ३ लाख ६८ हजार ४९२, पिंपरी-चिंचवडमध्ये ३ लाख ९९ हजार ६०१, तर ग्रामीणमध्ये ५ लाख ९२ हजार २७७ लसीकरण झाले आहे. त्यामध्ये लसीचा पहिला आणि दुसरा डोसचा समावेश आहे.

आरोग्य विभागामार्फत नागरिकांचे समुपदेशन -

महापालिकेने 'हर घर दस्तक' च्या माध्यमातून लस न घेतलेले आणि दुसरा डोस प्रलंबित असलेल्यांची माहिती गोळा केली आहे, अजूनही करत आहोत. लस ही ऐच्छिक आहे. तरीही नागरिकांनी ती घ्यावी यासाठी आरोग्य विभागामार्फत आपण नागरिकांचे समुपदेशन सुरूच ठेवले आहे. त्याचमुळे सुमारे १३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. अशी माहिती पुणे महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. आशीष भारती यांनी दिली.

हेही वाचा - Dilip Walse Patil On OBC Reservation : इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी वेळ द्या, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी

Last Updated :Dec 15, 2021, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.