ETV Bharat / city

Pune Traffic Police Action : बेशिस्त पुणेकरांना पोलिसांनीही घडवली अद्दल.. तब्बल १२२ कोटी रुपयांचा केला दंड..

author img

By

Published : Dec 26, 2021, 5:40 PM IST

डीसीपी राहुल श्रीरामे
डीसीपी राहुल श्रीरामे

पूर्वी पुणेकर म्हटले की, शिस्तप्रिय नागरिक समजले जायचे. पण आता पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे ( Pune Traffic Police Action ) पुण्यात बेशिस्त वाहतूक चालकांची संख्या वाढली असल्याचे दिसते. याच बेशिस्त वाहन चालकांना अद्दल घडवत वाहतूक पोलिसांनी ( Action Against Unruly Drivers Pune ) तब्बल १२२ कोटींच्या दंडाची आकारणी केली आहे.

पुणे - पुण्यामध्ये वाहतुकीचे अनेक प्रश्न असताना बेशिस्त, नियम मोडणारे वाहन चालक देखील सर्रास दिसून येतात. याच बेशिस्त वाहन चालकांवर गेल्या वर्षभरामध्ये तब्बल १२२ कोटी रुपये दंडाची आकारणी ( Action Against Unruly Drivers Pune ) करण्यात आली आहे. यामध्ये ३५ लाख ५४ हजार ट्रॅफिक चलनांची नोंद झाली ( Pune Traffic Police Action ) असल्याची माहिती पुणे वाहतूक विभागाचे डीसीपी राहुल श्रीरामे ( DCP Rahul Shrirame ) यांनी दिली.

बेशिस्त पुणेकरांना पोलिसांनीही घडवली अद्दल.. तब्बल 122 कोटी रुपयांचा केला दंड..
सर्वाधिक दंड आकारणी हेल्मेट न घालणाऱ्यांची! मोटार व्हेईकल ॲक्टनुसार ( Motor Vehicle Act ) हेल्मेट घालणे अनिवार्य ( Helmet Is Compulsory ) आहे. असे असूनही पुण्यामध्ये सर्रास या नियमाचे उल्लंघन केले जाते. सीसीटीव्हीद्वारे हेल्मेट न घालणाऱ्या लोकांवर दंड आकारला जातो. खरंतर हेल्मेट घालणे हे आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. त्यामुळेच मोटार व्हेईकल ॲक्टमध्ये हेल्मेट अनिवार्य केले आहे. मागील वर्षी रस्ते अपघातामध्ये १४३ लोक मरण पावले. यातील ८० लोकं दुचाकीवर होते. त्यातील ७२ लोकांनी हेल्मेट घातलेले नव्हते. कदाचित त्यांनी जर हेल्मेट घातले असते तर त्यांचा जीवावर हे अपघात बेतले नसते.चुकीच्या चलनाची करा तक्रार!बरेच वेळा वाहनधारकांना चुकीचे ई- चलन ( Wrong Traffic Chalan Complaint ) आल्याचे प्रकार घडतात. याबाबत श्रीरामे म्हणाले की, काही वाहनधारक आपल्या नंबरप्लेटमध्ये किरकोळ बदल करतात. यामुळे जर त्यांनी कोणतीही वाहतुकीचे नियम तोडले तर, त्यांच्या ऐवजी दुसऱ्यांच्या वाहनावर चलन लागते. यामुळेच इतर वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. लोक अदालतमध्ये यावर्षी ५ लाख ६२ हजार नोटीस आपण पाठवल्या. यामध्ये ८ हजार २०० तक्रारी या चुकीच्या चलनाच्या होत्या. जर कुणाला चुकीचे चलन प्राप्त झाले असेल तर, महाट्राफिक ॲप डाऊनलोड ( Maha Traffic App Download ) करून त्यामध्ये आपली तक्रार दाखल करावी. तर तुम्हाला आलेले चुकीचे चलन रद्द होऊ शकते. यासह डीसीपी ट्रॅफिक ऑफिस, येरवडा येथेही तुम्ही तक्रार दाखल करू शकता. चुकीचे चलन आले तर घाबरू नका. फक्त त्याची तक्रार आमच्याकडे नोंदवा, असे आवाहन यावेळी श्रीरामे यांनी केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.