ETV Bharat / city

लॉक दुरुस्तीच्या बहाण्याने घरफोडी करणाऱ्या चोरट्याला नंदुरबारातून पुणे पोलिसांनी केली अटक

author img

By

Published : Aug 3, 2022, 12:40 PM IST

लॉक दुरुस्तीच्या बहाण्याने घरफोडी करणाऱ्या चोरट्याला नंदुरबारातून पुणे पोलिसांनी केली अटक
लॉक दुरुस्तीच्या बहाण्याने घरफोडी करणाऱ्या चोरट्याला नंदुरबारातून पुणे पोलिसांनी केली अटक

लॉक दुरुस्तीसाठी नट आणण्याचे सांगून घरातील महिलेला बाहेर पाठविल्यानंतर बनावट चावीने कपाट उघडून 15 तोळे दागिने आणि दोन लाख रुपये रोकड घेऊन तो पसार झाला होता. माहिती मिळतातच बंडगार्डन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे - लॉक दुरुस्तीच्या बहाण्याने विविध ठिकाणी घरफोडी करणार्‍या एका सराईत गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी नंदुरबार जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. प्रधानसिंग उर्फ पठाण बख्तारसिंग शिकलीकर (41, रा. नंदूरबार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शिकलीकर हा रेकार्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गुजरात राज्यातील राजकोट, सुरत शहरात 7 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

लॉक दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने घरफोडी - शिकलीकर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, तो घरफोड्या करण्यात पटाईत आहे. तो शहरात आल्यानंतर एखाद्या लॉजवर आपला तळ ठोकतो. त्यानंतर विविध ठिकाणी लॉक दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने फिरतो. एखाद्या व्यक्तीने घरात लॉक दुरुस्तीसाठी बोलावले की, लॉकचे साहित्य घेऊन येण्यासाठी घरातील व्यक्तीला तो बाहेर पाठवतो. त्याचवेळी एखादी व्यक्ती दुसरी जर घरात असले तर तिला देखील वेगळा बहाणा सांगून तेथून दुर लावलो. दरम्यान संधी मिळताच घरातली किंमती ऐवज चोरी करून तो पाबोरा करतो. अशाप्रकारे त्याने अनेक ठिकाणी चोर्‍या केल्या आहेत. अगदी बाहेरच्या राज्यात देखील त्याच्यावर असे गुन्हे दाखल आहेत.


बंडगार्डन पोलिसांनी अवघ्या 24 तासात दोघांना ताब्यात घेतले - लॉक दुरुस्तीसाठी नट आणण्याचे सांगून घरातील महिलेला बाहेर पाठविल्यानंतर बनावट चावीने कपाट उघडून 15 तोळे दागिने आणि दोन लाख रुपये रोकड घेऊन तो पसार झाला होता. माहिती मिळतातच बंडगार्डन पोलिसांनी अवघ्या 24 तासात दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बनावट चावीने कपाटाचे लॉक खोलले - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.26) ताडीवाला रस्ता परिसरात ही घटना घडली होती. लॉकदुरूस्त करण्याकरीता दोघेजण मंगळवारी ताडीवाला रस्ता भागात फिरत होते. फिर्यादी यांच्या कपाटाचे लॉक खराब झाल्याने त्यांनी दोघांना लॉक दुरूस्त करण्याचे सांगितले. त्यानुसार चोरट्यांनी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. लॉक दुरूस्तीसाठी नट लागणार असल्याचे सांगून दोघांनी नट आणण्यासाठी महिलेला घराबाहेर दूकानामध्ये पाठविले. तर घरातील मुलाल तेल घेऊन येण्यास सांगितले. ही संघी साधून एका बनावट चावीने कपाटाचे लॉक खोलून सोन्याच्या बांगड्या, चैन, मंगळसूत्र, झूमके असे तब्बल 15 तोळ्यांचे दागिने आणि 1 लाख 90 हजारांची रोकड घेऊन दोघेही पसार झाले. महिलेने सांगितलेले आरोपीचे वर्णन आणि सीसीटीव्हीतील फुटेजच्या आधारे तपास करून आरोपी हे नंदूरबार येथे असल्याची माहिती पोलिस कर्मचारी नितीन जगताप यांना गुजरात येथील बातमीदारांकडून समजले.



मुद्देमाल जप्त - त्यानंतर बंडगार्डन पोलिसांचे एक पथक नंदूरबार येथे गेले होते. तेथे आरोपी हे मुद्देमाल विकण्याच्या तयारीत असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 15 तोळे सोन्याचे दागिने व 1 लाख 90 हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, आश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, कर्मचारी संजय वणवे, अमोल सरडे, मनोज भोकरे, ज्ञाना बडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.