ETV Bharat / city

Pune Father in Law Murder : कौटुंबिक वादातून जावायाने केला सासऱ्याचा खून, आरोपी चाकू घेऊन पोहोचला पोलीस ठाण्यात

author img

By

Published : Apr 21, 2022, 3:22 PM IST

Pune Father in Law Murder
कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याचा खून केला

पुण्यात कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याचा चाकूने वार करत खून ( Pune Father in Law Murder ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील खडकी बाजार परिसरात काल ही घटना घडली असून रमेश उत्तरकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी अशोक कुडले हा त्यांचा जवाईच आहे. या घटनेनंतर आरोपी अशोक कुडले स्वतः हातात चाकू घेत खडकी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला. आणि खून केलेली कबुली देखील दिली.

पुणे - कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याचा चाकूने वार करत खून ( Pune Father in Law Murder ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील खडकी बाजार परिसरात काल ही घटना घडली असून रमेश उत्तरकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी अशोक कुडले हा त्यांचा जवाईच आहे. या घटनेनंतर आरोपी अशोक कुडले स्वतः हातात चाकू घेत खडकी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला. आणि खून केलेली कबुली देखील दिली.

काय आहे प्रकरण - याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक कुडले रमेश उत्तरकर यांचा जावई आहे. 2019 पासून आरोपी अशोक आणि त्याच्या पत्नीत वाद होते. त्यामुळे ते दोघे वेगळे राहायचे. त्याची पत्नीही गेल्या तीन वर्षापासून वडिलांकडे राहायला आहे. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.

सासऱ्यावर केले चाकुने वार - दरम्यान या दोन कुटुंबातील वाद हा न्यायप्रविष्ट आहे. अशोक कुडले हा आपल्या पत्नीला नांदायला परत पाठवा अशी मागणी सतत आपल्या सासर्‍याकडे करत होता. तर उत्तरकर हे घटस्पोट देण्याबाबत ठाम होते. याच प्रकरणी काल न्यायालयात तारीख होती. या दरम्यानच या दोघांमध्ये काल दुपारी वाद झाला. हाच वादाचा राग डोक्यात ठेवून संध्याकाळी अशोक हा उत्तरकर यांच्या दुकानी गेला. उत्तरकर हे सायंकाळी दुकानात बसले असता अशोक कुडले याने त्यांच्या दुकानात जाऊन चाकूने जोरदार वार केले. आणि उत्तरकर यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अशोक कुडले स्वतः हातात चाकू घेत खडकी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. आणि खून केलेली कबुली देखील दिली.

हेही वाचा - Aurangabad Crime News : चोरीच्या संशयावरून तरुणाला लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण; तरुणाचा जागीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.