ETV Bharat / city

Pune Airport Contractor Fined : 500 मिली पाण्याची बाटली 70 रुपयांना विकल्याबद्दल पुणे विमानतळाच्या कंत्राटदारावर झाली दंडात्मक कारवाई

author img

By

Published : Apr 7, 2022, 4:06 PM IST

Pune Airport Contractor Fined
पुणे विमानतळाच्या कंत्राटदाराला दंड

फ्लायर्सना पाण्याच्या बाटल्या घेऊन जाण्याची परवानगी नाही. आणि टर्मिनल इमारतीच्या आतील दुकानांमध्ये पाण्याच्या बाटल्या चढ्या दराने विकल्या जात आहेत, अशी तक्रार एका प्रवाश्याने केली होती. त्यानंतर प्रशासनाने या याबाबत सविस्तर चौकशी करून कंत्राटदाराला दंड ( Pune Airport Contractor Fined ) ठोठावला आहे.

पुणे - पाण्याच्या बाटल्या चढ्या दराने विकल्या जात असल्याच्या प्रवाशांकडून तक्रारी आल्यानंतर पुणे विमानतळाने ( Pune Airport ) कंत्राटदारांना दंड ठोठावला आहे. सुरक्षा तपासणी दरम्यान, फ्लायर्सना पाण्याच्या बाटल्या घेऊन जाण्याची परवानगी नाही. आणि टर्मिनल इमारतीच्या आतील दुकानांमध्ये पाण्याच्या बाटल्या चढ्या दराने विकल्या जात आहेत, अशी तक्रार एका प्रवाश्याने केली होती. त्यानंतर प्रशासनाने या याबाबत सविस्तर चौकशी करून कंत्राटदाराला दंड ( Pune Airport Contractor Fined ) ठोठावला आहे.

Senior journalist Parag Karandikar
ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर यांचे ट्वीट

काय आहे नेमके प्रकरण - प्रवासी ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर ( Senior journalist Parag Karandikar ) यांनी ट्विट केले की, “ही प्रवाशांची मोठी फसवणूक आहे. @aaipunairport .. 500ml च्या पाण्याच्या बाटलीची किंमत 70 रुपये आकारात आहे. प्रवाशांना अजुन इतर कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत कारण सुरक्षा नियमानुसार तुम्हाला तुमचे स्वतःचे पाणी वाहून नेण्याची परवानगी देत ​​नाही आणि विमानतळावरील विक्रेते मात्र पाण्याचा सामान्य ब्रँड ठेवत नाहीत. अशा वेळी ही लाचारी पत्करावी असे त्यांनी ट्विट केले. याला समर्थन देत अजुन एका प्रवाशाने ट्विट करत म्हटले आहे. @RailMinIndia परवडणाऱ्या किमतीत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ शकत असेल तर @aaipunairport @AAI_Official हे का करू शकत नाही. विमानतळ असल्याने किंमत दुप्पट करणे समजू शकते परंतु ही किंमत 14 पट जास्त आहे. तर ” हरजीत सिंग खालसा यांनी ट्विट करत म्हटले आहे, “सर, आमच्याकडे दिल्ली आणि मुंबई विमानतळाप्रमाणे पाण्याच्या बाटलीसाठी वेंडिंग मशीन का नाही..?? आम्हाला तिथे Aquafina सारख्या चांगल्या ब्रँडची 500 ml बाटली फक्त 10 रुपयांमध्ये मिळते.” या ट्विट नंतर विमानतळ प्रशासनाला जाग आली असून त्यांनी अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली आहे अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली.

विमानतळ प्रशासनाची दंडात्मक कारवाई - पाण्याच्या बाटल्या चढ्या दराने विकल्याप्रकरणी कंत्राटदाराला निविदा अटींनुसार दंड ठोठावण्यात आल्याचे पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले. मात्र त्यांनी किती दंडात्मक कारवाई झाली यांची माहिती देण्यास नकार दिला. पुणे लोहगाव विमानतळावर अर्धा लिटर पाण्यासाठी प्रवाशांना मोजावे लागत होते. चक्क 70 रुपये म्हणजेच इथे 140 रुपये लिटर पाणी विकले जात होते. काही प्रवाशांच्या ट्विटनंतर त्यांनी विमानतळ प्रशासनाला ही बाब लक्षात आणून दिली आणि त्यानंतर असे गैरप्रकार रोखण्यासाठी विमानतळाने दंडात्मक कारवाई केली आहे.

हेही वाचा - Action On Viral Video : नागपुरात धावत्या कारवर स्टंटबाजी पडली महागात; पोलिसांनी केल्या कार जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.