ETV Bharat / city

लालमहल लावणीप्रकरणी कठोर कारवाई करा : भाजप शहर अध्यक्षांची मागणी

author img

By

Published : May 21, 2022, 1:53 PM IST

Updated : May 21, 2022, 4:43 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र वास्तूत लावणी सादर ( Pictured planting in Lal Mahal ) करून तमाम शेवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. लाल महालात लावणी चित्रित केल्यामुळे त्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे. ( A case should be registered against Lal Mahal for planting)

BJP city president giving a statement
शहाराध्यक्ष जगदीश मुळीक निवेदन देताना

पुणे : हिंदुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने आणि पराक्रमाने पावन झालेला लालमहल समस्त हिंदूंसाठी एक पवित्र स्थान आहे. ( History of Hindavi Swarajya in Lal Mahal ) ही केवळ एक वास्तू नसून, हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाचे सोनेरी पर्व यात दडलेले आहे. त्यामुळे या वास्तूची गरिमा, पावित्र्य राखणे अत्यंत आवश्यकच आहे. समाज माध्यमात व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ( Emotions hurt by presenting planting in the sacred Vastu ) सदर व्हिडीओ हा लालमहलमध्ये चित्रित केला गेला असून, यात लावणीवर नृत्य केल्याचा प्रकार आहे. लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असली, तरी त्याचे सादरणीकरण करण्यासाठी वेगळी व्यासपीठे उपलब्ध आहेत. मात्र, तरीही लालमहलमध्ये हा प्रकार घडला. हे जितके धक्कादायक आहे, तितकेच चीड आणणारेही. सदर प्रकारामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या असून, आपण स्वतः या प्रकरणी लक्ष घालून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन केली.


संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी : नृत्य सादर केल्याप्रकरणी नृत्यांगनेवर कारवाई तर करावीच, शिवाय तिला आतमध्ये जाण्यास कोणी मदत केली? सुरक्षारक्षक काय करीत होते? जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका काय? याचीही उत्तरे मिळवून योग्य ती कारवाई तातडीने करावी, अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे, असे यावेळी मुळीक यांनी सांगितलं.


राष्ट्रवादीचे आंदोलन ही नौटंकी : या विषयासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आंदोलन ही नौटंकी आहे. लाल महालाच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेची आहे. सध्या पालिकेत प्रशासक आहे. त्यावर राज्य सरकारचे नियंत्रण आहे. राज्य सरकार राष्ट्रवादीचे असल्याने तेच जणू स्वतःच्याविरोधात आंदोलन करण्याचा खोटा, बेडगी प्रयत्न करीत आहेत. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी ते आंदोलन करीत आहेत, अशी टीकादेखील यावेळी मुळीक यांनी केली.

हेही वाचा : Lal Mahal : लाल महाल लावणी प्रकरण.. वैष्णवी पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल

Last Updated :May 21, 2022, 4:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.