ETV Bharat / city

पुण्यात वाद्य, बँड पथकांना अखेर परवानगी... पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा

author img

By

Published : Oct 23, 2021, 5:08 PM IST

राज्यात आणि शहरात कोरोना रुग्णासंख्या कमी होत असल्याने राज्य सरकारच्यावतीने हळूहळू निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. गेल्या 2 वर्षांपासून पुण्यात बंद असलेल्या वाद्य आणि बँड पथकांना अखेर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, आत्ता येणाऱ्या काळात वाद्यांचा निनाद पुन्हा घुमणार आहे.

band play permission pune etvbharat
बँड पथक परवानगी पुणे

पुणे - राज्यात आणि शहरात कोरोना रुग्णासंख्या कमी होत असल्याने राज्य सरकारच्यावतीने हळूहळू निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. गेल्या 2 वर्षांपासून पुण्यात बंद असलेल्या वाद्य आणि बँड पथकांना अखेर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, आत्ता येणाऱ्या काळात वाद्यांचा निनाद पुन्हा घुमणार आहे. परवानगी मिळाल्याने बँड पथकांकडून बँड वाजवून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.

माहिती देताना पुणे बँड कलाविकास प्रतिष्ठानेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष

हेही वाचा - देशात कोरोनाने मृत्यूतांडव केलेले असताना भाजपकडून सेलिब्रेशन यापेक्षा दुर्दैव कोणतंच नाही - नाना पटोले

दोन डोस पूर्ण असणे बंधनकारक

पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. वाद्य पथकांसह बँड पथकांना देखील परवानगी दिली गेली असली तरी पथकातील वाद्य वाजवणाऱ्या सर्व व्यक्तींची व कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले असणे बंधनकारक असणार आहे. तसेच, याबाबतची खात्री करण्याची जबाबदारी पथक व्यवस्थापनाची राहणार आहे. हे आदेश महापालिका क्षेत्रामध्ये येणार्‍या खडकी व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड्सनाही लागू राहणार आहे.

..तर खूपच चांगले झाले असते

कोरोनाच्या काळात वाद्य पथक, तसेच बँड पथक वादकांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागले. कोणी भाजी विक्री केली, तर कोणी किराण्याचे दुकान सुरू केले, तर ज्याला जमेल त्याने तो व्यवसाय केला. मात्र, असे असतानादेखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बँड पथक यांना परवानगी दिल्याने येणाऱ्या काळात बँड पथक व्यवस्थापनाकडून सरकारने दिलेल्या आदेशाचा परिपूर्ण पालन केल जाईल. हा आदेश जर गणेश उत्सवाच्या दिवसांत देण्यात आला असता तर खूपच चांगले झाले असते, कारण गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात वादन केले जाते. आत्ता परवानगी दिली असली तरी हा व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी कमीत कमी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती बँड पथक वादक यांनी दिली.

हेही वाचा - 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील 40 लाख महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकरण - उदय सामंत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.