ETV Bharat / city

एक इंडिया मिशन : ७,५०० सैनिकांना देण्यात येणार सोने आणि हिऱ्यापासून बनवलेली 'कमिटमेंट रिंग्ज' भेट

author img

By

Published : Jul 15, 2022, 8:10 PM IST

Bonisa Jewelers
एक इंडिया मिशन

पुण्यातील ‘बोनिसा’ ज्वेलर्सतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर (पीआरसी) येथील 88 माजी सैनिकांना 'एक इंडिया रिंग्ज' देण्यात आल्या आहेत. याची सुरुवात 26 जानेवारी रोजी करण्यात आली होती. देशभरातील विविध राज्यातील माजी सैनिकांना ही रिंग देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संकेत बी बियाणी यांनी दिली.

पुणे - भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचे औचित्य साधून देशभर विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यातील बोनिसा ज्वेलर्सतर्फे ( Bonisa Jewelers ) यावर्षी 7,500 माजी सैनिकांना चांदी, सोने, हिरे आणि विविध राज्यांतील मातीपासून बनवलेल्या 'कमिटमेंट रिंग्ज' भेट देण्यासाठी 'एक इंडिया मिशन' सुरू ( One India Mission ) करण्यात आले आहे.

संकेत बी बियाणी यांच्यासोबत प्रतिनिधीने साधलेला संवाद

माजी सैनिकांना ही रिंग देण्यात येणार - पुण्यातील ‘बोनिसा’ ज्वेलर्सतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर (पीआरसी) येथील 88 माजी सैनिकांना 'एक इंडिया रिंग्ज' देण्यात आल्या आहेत. याची सुरुवात 26 जानेवारी रोजी करण्यात आली होती. देशभरातील विविध राज्यातील माजी सैनिकांना ही रिंग देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संकेत बी बियाणी यांनी दिली.

One India Mission
एक इंडिया मिशन

ही आहे रिंग्जची खासियत - बोनिसाचे भागीदार असलेले सैनबाल ज्वेलरी एलएलपीचे संकेत बी बियाणी आणि त्यांचा भाऊ संदेश बियाणी, बहिण नेहा मुंद्रा यांनी वर्षभरापूर्वी या उपक्रमाबद्दल विचार करत, त्यादिशेने काम सुरु केले होते. एक इंडिया रिंग ही चांदी (जी आपल्याला शांत ठेवते), सोने (जे 'भारत'चे प्रतीक आहे), आपल्या देशातील प्रत्येक राज्यातील माती (एकतेसाठी) आणि हिरा (आपल्यापैकी प्रत्येकजण एक हिरा आहे) यांच्यापासून बनलेली आहे. ही अंगठी जगातील पहिली राष्ट्रासाठी समर्पित असलेली, देशाप्रती ‘वचनबद्धता’ दर्शविणारी अंगठी आहे आणि यावर्षी स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ७५०० हून अधिक सैनिकांना ही अंगठी देण्याचे आमचे ध्येय आहे. ही अंगठी चांदीची आहे आणि त्यावर सोनेरी अक्षरात 'भारत' लिहिलेले आहे जे भारताचे 'सोने की चिडिया' असण्याचे प्रतीक आहे.आणि यात विशेष करून 29 राज्यातून माती आण्यात आली आहे. असे यावेळी संकेत बी बियाणी यांनी सांगितलं.

यासाठी हा अभिनव उपक्रम - बोनिसा ज्वेलर्स हे खासकरून लग्नाच्या अंगठ्या बनविण्यासाठी ओळखले जाते. म्हणूनच आम्ही आपल्या देशाच्या एकतेचे प्रतीक म्हणून 'कमिटमेंट रिंग'चा विचार केला. या अंगठीची कल्पना एक पॉडकास्ट ऐकताना माझ्या मनात आली आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही अंगठी देण्याचा निर्णय घेतला. मला वाटते की बांधिलकी ही केवळ पती-पत्नी किंवा इतर नात्यांपुरती मर्यादित नाही. आपल्या देशाप्रतीही आपली एक बांधिलकी आहे. त्यामुळे केवळ आम्हीच नाही, तर कोणीही आपल्या सैनिकांना ही अंगठी भेट देऊ शकते आणि या चळवळीचा एक भाग बनू शकते.असं देखील संकेत बी बियाणी यांनी म्हटले आहे.

आत्तापर्यंत 200 माजी सैनिकांना रिंग्ज - या अभिनव उपक्रमाची सुरुवात 26 जानेवारीला झाली असून आत्तापर्यंत 200 माजी सैनिकांनी ही रिंग्ज देण्यात आली आहे. यात माजी सैनिक, वीर पत्नी यांचा समावेश असून या उपक्रमातर्गत देशभरातील विविध राज्यातील माजी सैनिकांना ही रिंग देण्यात येणार आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray : शिवसैनिकावर हल्ला, उद्धव ठाकरे संतापले; म्हणाले, 'जीवाशी येत असेल तर खपवून...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.