Omicron Variant Impact : लहान मुलांच्या लसीकरणासाठी तत्काळ नियोजन करणे आवश्यक - डॉ. अविनाश भोंडवे

author img

By

Published : Dec 7, 2021, 8:24 PM IST

Updated : Dec 7, 2021, 8:44 PM IST

डॉ. अविनाश भोंडवे

भारतात ऑक्टोबरमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाला आपत्कालीन परवानगी मिळाल्यानंतर देखील नियोजन करण्यात आलेल नाही. त्यामुळे ओमायक्रॉनचा धोका अधिक असताना लहान मुलांच्या लसीकरणाच ( Vaccination of Children ) काय? असा प्रश्न तयार होत आहे. लहान मुलांच्या लसीकरणाचा लवकरात लवकर नियोजन करावे, अशी प्रतिक्रिया आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे ( Former IMA President Dr. Avinash Bhondwe ) यांनी दिली आहे.

पुणे - ओमायक्रॉनचा धोका राज्यात असताना दिवसेदिवस ओमायक्रॉनच्या रुग्णांत वाढ ( Patients Of Omicron Variant ) होत आहे. या व्हेरियंटचा धोका लहान मुलांना अधिक ( Childrens High Risk ) असल्याचे सांगितले जात असताना भारतात ऑक्टोबरमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाला आपत्कालीन परवानगी मिळाल्यानंतर देखील नियोजन करण्यात आलेल नाही. त्यामुळे ओमायक्रॉनचा धोका अधिक असताना लहान मुलांच्या लसीकरणाच ( Vaccination of Children ) काय? असा प्रश्न तयार होत आहे. लहान मुलांच्या लसीकरणाचा लवकरात लवकर नियोजन करावे, अशी प्रतिक्रिया आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे ( Former IMA President Dr. Avinash Bhondwe ) यांनी दिली आहे.

माहिती देतांना डॉ. अविनाश भोंडवे



ओमायक्रॉन कोरोनाचा जो नवीन व्हेरियंट आहे. तो लसींना जरी कमी दाद देत असला तरी आत्ता जगात ज्या लसी आहे. त्या लसींना 40 ते 50 टक्के दाद देत आहे. तसेच हे ही लक्षात आले आहे की ज्या लोकांनी लस घेतलेली नाही, अशा लोकांना ओमायक्रॉनची लवकर बाधा होत आहे. भारतात अजूनही 18 वर्षाखालील मुलांमध्ये लस सुरू झालेली नाही. त्यामुळे या गटाला खूप मोठ्या प्रमाणात धोका या ओमायक्रॉनपासून आहे. साऊथ आफ्रिकेत आत्तापर्यंतच्या रुग्णांमध्ये जी पाहणी करण्यात आली आहे. त्यात 60 वर्षावरील नागरिकांना जास्त बाधा झाली आहे. तर दुसरा जो गट आहे तो म्हणजे लहान मुलं. 5 वर्षाखालील मुलांना मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनची बाधा झालेली आहे. भारतात देखील याचा धोका असून लहान मुलांच लसीकरण मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. भारतात ऑक्टोबरमध्ये लहान मुलांच्या लसीला अपात कालीन परवानगी मिळाल्यानंतर देखील त्याच नियोजन करण्यात आलेल नाही. त्यामुळे या लहान मुलांच्या लसीकरणाच नियोजन लवकरात लवकर करण्यात यावे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केला आहे.

  • पिंपरी-चिंचवड येथील सहा जणांपैकी तिघे हे 18 वर्षाखालील

काल पिंपरी चिंचवड येथे सहा रुग्ण ओमायक्रॉनची आढळून आलेली आहे. त्यापैकी तीन जण 18 वर्षाखालील आहे. नायजेरियातील नागरिक असणारी भारतीय वंशाची 44 वर्षाची महिला तिच्या 12 आणि 18 वर्षाच्या मुलीस आणि तिच्या भावाच्या मुलीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. पिंपरी चिंचवड येथील सहा जणांपैकी तिघे हे 18 वर्षाखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे.

  • राज्यात ओमायक्रॉनचे 10 रुग्ण

जगभरात कोरोनानंतर आता अमोयक्रॉन विषाणूचा प्रसार होऊ लागला आहे. राज्यात डोंबिवलीत 1 पिंपरी - चिंचवडमध्ये 6 तर पुणे येथे 1 आणि आत्ता मुंबईत 2 अशा 10 रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनबाबत चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा - Omicron, Hospitals Equipped With Oxygen : ओमायक्रॉनसाठी राज्यात सतर्कता,ऑक्सिजनसह रूग्णालये सज्ज,नव्या लसीवरही संशोधन

Last Updated :Dec 7, 2021, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.