ETV Bharat / city

Presidential Election 2022 : राष्ट्रवादीच्या बैठकीत राष्ट्रपती पदाबाबतची कोणतीही चर्चा नाही!

author img

By

Published : Jun 14, 2022, 2:37 PM IST

Dilip Walse Patil
Dilip Walse Patil

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (shard pawar ) यांनी राज्यसभेत महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाल्याबाबत बैठक आपल्या निवासस्थानी 13 जून ला बोलवली होती. त्यामुळे या बैठकीत शरद पवार यावेळी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत (Presidential Election 2022) उमेदवार असण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं राज्याचे गृहमंत्री ( Home Minister State ) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil ) यांनी स्पष्ट केल आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (shard pawar ) यांनी राज्यसभेत महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाल्याबाबत बैठक 13 जूनला आपल्या निवासस्थानी बोलवली होती. त्यामुळे या बैठकीत शरद पवार यावेळी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत (Presidential Election 2022) उमेदवार असण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं राज्याचे गृहमंत्री ( Home Minister State ) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil ) यांनी स्पष्ट केल आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेत महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाल्याबाबत बैठक आपल्या निवासस्थानी 13 जूनला बोलवली होती. त्यामुळे या बैठकीत शरद पवार यावेळी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवार असण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं राज्याचे गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केल आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी बोलावलेली बैठक केवळ राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी होती. तसेच 20 जून ला होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबारनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिलीप वळसे पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिले. जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शरद पवार उमेदवार म्हणून विरोधी पक्षाकडून इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या चर्चांना गृहमंत्र्यांनी पूर्णविराम दिला असून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत शरद पवार यांनी कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केला आहे.

हेही वाचा- Pm Modi will do puja at Dehu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार वारकरी भागवत पताका स्तंभाचे पूजन

हेही वाचा- राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शरद पवार यांचे भवितव्य काय, वाचा एका क्लिकवर सर्व लेखाजोखा

हेही वाचा- Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे घेणार रामल्लाचे दर्शन.. अयोध्येतून साधणार 'दिल्ली'वर निशाणा..?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.