Violence Against Sex Workers Pune : या महिलांना समाजाने नाकारणे हीच सर्वात मोठी हिंसा

author img

By

Published : Dec 17, 2021, 7:22 AM IST

Updated : Dec 17, 2021, 4:00 PM IST

वारंगणावरील अत्याचारविरोधी दिन

वेश्यांवर ( Budhawar Peth Women In Pune ) होणारा हिंसाचार विरोधात 17 डिसेंबर रोजी इंटरनॅशनल डे अगेन्स सेक्स वर्कर ( Violence Against Sex Workers Day Pune ) पाळला जातो. मात्र, अशा वेळेस महिलांवर होणारा अत्याचार कमी झाला आहे का याचा विचार करणे गरजेचे आहे.

पुणे - 17 डिसेंबरला वारंगणावरील अत्याचार निर्मूलन दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. आज प्रत्येक शहरात मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय करणारे महिला (Transgender Community) हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.पुणे शहरातील बुधवार पेठ तर राज्यातील सर्वात मोठी वेश्या व्यवसाय करणारी वस्ती म्हणून ओळखली जाते. याच वेळेस या महिलांवर होणारे अत्याचार, त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होणारी धावपळ, दिवस रात्र या महिलांना होणार त्रास हा खरंच कमी झालेला आहे का ? असा प्रश्न विचार करण्याजोगा आहे. या महिलांच्या उपजीविकेच्या साधनांचे गुन्हेगारीकरण होण हे सगळ्यात मोठी हिंसा असून याला या महिला आजही बळी पळत आहे. ही अतिशय खेदाची गोष्ट असल्याची खंत सहेली संस्थेच्या (Saheli NGO) अध्यक्षा तेजस्वी सेवेकरी यांनी व्यक्त केली आहे.

व्हीडीयो
का पाळला जातो हा दिवस
वेश्यांवर होणारा हिंसाचार विरोधात 17 डिसेंबर रोजी इंटरनॅशनल डे अगेन्स सेक्स वर्कर (International Day To Against The Sex Worker) पाळला जातो. मुळात गॅरी लियोन रिजने वेश्यांवर केलेल्या हिंसाचाराची गंभीर दखल घेऊन हा दिन पाळण्याची सुरवात करण्यात आली. 1980 ते 1990 च्या दरम्यान त्याने 48 महिलांची हत्या केली होती. त्यात प्रामुख्याने वेश्यांचा समावेश होता. या महिलांबरोबर शारीरिक संबंध झाल्यानंतर त्यांचा गळा आवळून त्यांना ठार मारत असे. काहींना तर त्याने चक्क त्या मृतदेहांवर सुद्धा बलात्कार केला होता. म्हणून हा दिवस वेश्यांवर होणारा हिंसाचार विरोधातील दिवस म्हणून पाळला जातो.
या महिलांना नाकारणं हीच सर्वात मोठी हिंसा
17 डिसेंबर हा दिवस वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचार हिंसा विरोधी दिन म्हणून पाळला जातो .याचा मुख्य उद्देश हाच आहे की या महिलांवर होणारी हिंसा कमी करणे. याची सुरवात 2003 मध्ये झाली होती जेव्हा डॉ.अनिस पेंकल यांनी अमेरिकेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी कार्यक्रमाची सुरवात केली. त्यानंतर हा दिवस पाळला जातो. वेश्या व्यवसाय करणाऱ्या या महिलांवर सर्व प्रकारची हिंसा होत असते. शारिरीक, मानसिक त्याच बरोबर या महिलांवर वेगवेगळ्या लोकांकडून हिंसा केली जाते. तसेच स्टेट कडून देखील होणारी हिंसा या महिला सहन करत असतात. त्यांची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो.वेश्या व्यवसाय करणाऱ्या या महिलांना सतत हिंसेला सामोरे जावं लागतं याच प्रमुख कारण म्हणजे समाजकडून मिळणारी वागणूक. समाज या व्यवसायाला व्यवसाय म्हणून कधीच मान्यता देत नाही. याला अतिशय अनैतिक आणि वाईट काम समजलं जातं. हे कोणाच्या तरी उपजीविकेच साधन आहे. या दृष्टीने या व्यवसायाकडे कधीच बघितलं जात नाही. या महिलांना नाकारणं हीच सर्वात मोठी हिंसा असल्याचेही सेवेकरी म्हणाल्या.
व्यवसायात जास्त महिला
या व्यवसायात बळजबरीने घेऊन येणे असा जो पूर्वी प्रकार घडत होता तो आत्ता कमी झालेला आहे. महिला जबरदस्तीने आणले जातात ती मोठी हिंसा आहेच. पण स्वतः हुन आलेल्या महिलांवर जेव्हा जबरदस्ती केली जाते. किंवा त्यांना गुन्हेगार समजून त्यांना मारहाण होणे. ही हिंसाच असल्याचे सेवेकरी म्हणाल्या.
दररोज होते मारहाण
हा व्यवसाय करताना समाजाकडून तुच्छ नजरेतून महिलांना पाहिलं जातं. तसेच नागरिकांकडून मारहाण, गुंड लोकांकडून मारहाण, त्याचबरोबर पोलिसांकडून देखील होणारा त्रास हा आम्हाला सहन करावा लागतो. आज दवाखान्यात जात असताना आम्हाला बाहेर उभं केलं जातं. व्यवस्थित वागणूक दिली जात नाही. त्याच बरोबर पुरावे नसल्याने बँक तसेच विविध कागदपत्रे बनविण्यासाठी मोठ्या अडचणीला देखील सामोरे जावं लागतं, अशी खंतही वेश्या व्यवसाय करणारी एका महिलेने व्यक्त केली आहे.
Last Updated :Dec 17, 2021, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.