ETV Bharat / city

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर कडाडले, आदित्य ठाकरेंना म्हणाले, बैल गेला अन्...

author img

By

Published : Sep 25, 2022, 10:22 AM IST

वेदांता प्रकल्पावरून ( Vedanta Project ) आदित्य ठाकरे ( Shiv Sena leader Aditya Thackeray ) यांनी तळेगाव दाभाडे येथे निषेध आंदोलन केले. या बाबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, बैल गेला अन् झोपा केला अशी परिस्थिती आदित्य ठाकरेंची झाल्याची टीका केली आहे.

Gopichand Padalkar criticizes Aditya Thackeray
गोपिचंद पडळकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

पुणे - वेदांता प्रकल्पावरून ( Vedanta Project ) शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे ( Shiv Sena leader Aditya Thackeray ) यांनी तळेगाव दाभाडे येथे निषेध आंदोलन केले. या आंदोलनाबाबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, बैल गेला आणि झोपा केला अशी परिस्थिती आदित्य ठाकरे यांची झाली असून तुम्ही अडीच वर्ष मंत्री होतात, मुख्यमंत्री पद घरात होत तरी, देखील तुम्ही काही केलं नाही. अशी टीका पडळकर यांनी केली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्या शिक्षण मंडळ येथे आज भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

गोपिचंद पडळकर

काल पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( Popular Front of India ) वतीने ते आंदोलन करण्यात आलेल्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादचे नारे ( Pakistan Zindabad slogans in Pune ) लावण्यात आले असल्याचे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर पडळकर यांना विचारले असता ते म्हणाले की यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी प्रतीक्रिया दिली आहे. ज्यांनी घोषणा दिल्या आहेत.त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.असे यावेळी पडळकर म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.