ETV Bharat / city

Fire In Forest Pune : कात्रज बोगद्यावरच्या डोंगरावर जंगलात वनवा

author img

By

Published : Apr 4, 2022, 4:00 PM IST

पुणे बंगळुरू मार्गावरील कात्रज बोगद्याच्या आसपासच्या परिसरात काल रात्री डोंगरांवर भीषण वणवा ( fires in forest Katraj tunnel pune ) लागला होता. दर वर्षी उन्हाळ्यात या ठिकाणी वनवा लागण्याच्या घटना घडत असतात मात्र यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना आजपर्यंत प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.

Fire In Forest Pune
कात्रज बोगद्यावरच्या डोंगरावर जंगलात वनवा

पुणे - पुणे बंगळुरू मार्गावरील कात्रज बोगद्याच्या आसपासच्या परिसरात काल रात्री डोंगरांवर भीषण वणवा ( fires in forest Katraj tunnel pune ) लागला होता. दर वर्षी उन्हाळ्यात या ठिकाणी वनवा लागण्याच्या घटना घडत असतात मात्र यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना आजपर्यंत प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. डोंगर वाटांवर कोणत्याही प्रकारचा अग्निशामक दल देखील पोहचू शकत नाही अशावेळी हा वणवा कसा विझवावा हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

वणव्याच्या घटनात वाढ - यात आसपासचे संपूर्ण डोंगर जळून खाक झाले आहेत. वणव्यामुळे डोंगरांवर रोषणाई केल्यासारखे दृश्य दिसत होते. रात्र असल्याने जळाचे लोटच्या लोट दिसत होते. दर उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे डोंगरावर असणाऱ्या करवंद, बोर, आंबा याबरोबरच इतर जंगली वनस्पती आणि फळे वाया जात आहेत.

गुरांची वैरण वणव्यात जळून खाक - या वणव्यात शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या गुरांसाठी ठेवलेल्या वैरणी अचानक लागलेल्या वणव्यात जाळून खाक झाल्या आहेत. त्याचबरोबर सरपटणारे प्राणी, पक्षी यांसारख्या वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. वणव्यांपासून वनसंपदेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून आणि पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडली असल्याने अशावेळी तो विझवणेही अवघड होत होते.

हेही वाचा - Petrol Price Hike : दररोज होणाऱ्या इंधनदरवाढीवर काय म्हणातात मुंबईकर? पाहा VIDEO

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.