ETV Bharat / city

Fire Brigade Recruitment : पुणे अग्निशामक दलात भरती प्रकिया सुरू; 1 हजार 700 हून अधिक जवानांची गरज

author img

By

Published : Jul 20, 2022, 9:49 PM IST

पुणे अग्निशमन दलामध्ये ( Pune Fire Brigade ) सध्या फक्त 380 कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या दहा वर्षापासून पुणे शहरातील अग्निशमन दलात भरती प्रक्रिया ( Recruitment process of fire brigade closed ) राबविली गेली नसून फक्त आश्वासनावर आश्वासन दिले जात आहे.

Fire Brigade
फायर ब्रिगेड

पुणे - राज्यासह पुणे शहरात मागच्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस ( Heavy rain in Pune city ) आहे. पुणे शहरात पंधरा दिवसात 200 हून अधिक झाड पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर, 5 हून अधिक ठीकाणी भिंत कोसळल्या आहेत. तसेच 4 ते 5 ठीकाणी आगीच्या घटना घडल्या आहे. अशा या घटनांमध्ये रात्री अपरात्री कुठेही काहीही घटना घडली की, दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी संकटमोचक बनून धाव घेणाऱ्या पुणे अग्निशमन दलामध्ये ( Pune Fire Brigade ) सध्या फक्त 380 कर्मचारी हे काम करत आहे. गेल्या दहा वर्षापासून पुणे शहरातील अग्निशमन दलात भरती प्रक्रिया ( Recruitment process of fire brigade closed ) राबविली गेली नसून फक्त आश्वासनावर आश्वासन दिले जात आहे.

पुणे अग्निशामक दल

अशी आहे शहरातील अग्निशमन दलाची परिस्थिती - पुणे शहराची आताची लोकसंख्या ही तब्बल 60 लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत शहरात अग्निशमन दलात तब्बल 1 हजार 700 हून अधिक जवानांची गरज आहे. तर, 70 हून अधिक अग्निशमन केंद्राची गरज आहे. असे असताना शहरातील पुणे अग्निशमन दलाची परिस्थिती पाहिली तर, शहरात फक्त 380 जवान हे कार्यरत आहे. तर 14 अग्निशमन केंद्र सध्या कार्यरत आहे. तर 7 नव्याने बांधण्यात आले आहेत. ते पुढील महिन्यात सुरू होणार आहे. एकूणच शहरात केवळ 21 केंद्र, 380 कर्मचारी हे अग्निशमन दलात काम करत आहे. एकूणच शहरात अजूनही 49 केंद्रांची गरज आहे. तर शहरात 1 हजार 320 पदे रिक्त असून गेल्या 10 वर्षापासून अग्निशमन केंद्रात एकही पद भरलेले नाही.

जवानांना ताण घेऊन करावं लागतं काम - शहरात कुठेही काहीही घटना घडली की, अग्निशमन दलातील जवान स्वत:चा जीव धोक्यात घालून अडकलेल्यांची नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. अग्निशमन दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे अधिकाऱ्यांसह अग्निशामकांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे दलामधील रिक्त पदे भरावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र, गेली दहा वर्ष झाली फक्त आश्वासनांवर आश्वासन दिले जाते आहे. पण प्रत्यक्षात आहे त्याच कर्मचाऱ्यांवर या जवानांना काम करावं लागतं आहे.

हेही वाचा - Deepak Kesarkar : 'मातोश्री, शिवसेना भवनावर दावा केला नाही, परंतु...'; दीपक केसरकरांनी स्पष्टचं सांगितलं

रिक्त पदे भरली जाणार - 2014 साली सेवाप्रवेश नियम मान्य करण्यात आला होता. त्यावेळेस 900 हून अधिक जागा वाढवून मिळाल्या होत्या. पण त्यानंतर सेवा प्रवेश नियम मान्य न झाल्याने तो विषय प्रलंबित राहिला होता. पण, आता हे नियम 2 महिन्यांपूर्वी मान्य झाल्याने महापालिका ( Pune Municipality ) अधिकाऱ्यांनी भरती बाबत प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती यावेळी अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील गिलबिले यांनी यावेळी दिली.

खरंचं रिक्त पदे भरली जाणार का? - जरी 2014 नुसार अग्निशमन दलात जी 900 पदे रिक्त होती, ती जरी भरली गेली तरी शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पाहिजे तेवढी पदे भरली जाणार नाहीये. म्हणूनच आता तरी 2014 सालापासून 900 पदे जी रिक्त पदे आहे ती तरी भरली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा - OBC Reservation : दोन आठवड्यात निवडणुका घ्या; न्यायालयाची दिशाभूल करू नका : सर्वोच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.