ETV Bharat / city

एक एकरात 43 प्रकारची पिके.. बारामतीतील 'कृषिक' प्रदर्शनात पाहता येणार प्रात्याक्षिक

author img

By

Published : Jan 13, 2020, 11:51 AM IST

भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली  (NARI) नारी उपक्रमांतर्गत युनिसेफच्या माध्यमातून बारामती कृषी विज्ञान केंद्राने १ एकर क्षेत्रावर पोषणमूल्य आधारित 43 प्रकारच्या देशी पिकांची वैशिष्टपूर्ण लागवड केली आहे.

diffrents kinds of crops in one acre farm
एक एकारात 43 प्रकारची पिके.. बारामती कृषिक प्रदर्शनात पाहता येणार प्रयोग

पुणे - बारामती कृषी विज्ञान केंद्राने आधुनिक शेतीबरोबर आता पोषणमुल्य आधारीत शेतीपद्धतीची संकल्पना शेतकऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यंदाच्या कृषिक प्रदर्शनात एक एकर क्षेत्रात लागवड केलेल्या पोषणमुल्य आधारित 43 प्रकारच्या देशी पिकांची प्रात्याक्षिके शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे.

कृषी विज्ञान केंद्र बारामती

हेही वाचा... 'साखर उत्पादन क्षेत्र मोठ्या विपरित परिस्थितीत, त्याला सावरण्याची गरज'

बारामतीत शारदानगर येथे कृषी विज्ञान केंद्रात 16 जानेवारीपासून `कृषिक` प्रदर्शन सुरू होत आहे. या प्रदर्शनात पोषणमूल्य आधारित शेती पद्धतीलाही विशेष महत्व दिले जाणार आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली (NARI) नारी उपक्रमांतर्गत युनिसेफच्या माध्यमातून बारामती कृषी विज्ञान केंद्राने १ एकर क्षेत्रावर पोषणमूल्य आधारित 43 प्रकारच्या देशी पिकांची वैशिष्ठपूर्ण लागवड केली आहे.

हेही वाचा... "काँग्रेस-राष्ट्रवादीवाले नीट वागले नाही तर उद्धव ठाकरे राजीनामा देतील"

संतुलित आहार आणि शेती

शेती पद्धतीमध्ये पोषणमूल्य आधारित पिकांचा समावेश करण्यासाठी शेतीच्या विविध पर्यायांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. तसेच याबाबत जागरूकता होण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी यंदा कृषिक प्रदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीर आली यांनी केले आहे.

'संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, फक्त शारीरिक आरोग्य नाही. तर, मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी देखील आहारामध्ये सर्व घटकांचा योग्य प्रमाणात समावेश असणे गरजेचे आहे. ते पोषणमूल्य आधारित शेती पद्धतीमुळे शक्य होईल', असे आली यांनी म्हटले आहे. यासाठी नियोजीत प्रकल्पात बारामतीमधील मळद, गुणवडी व नीरावागज गावातील २०० शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे.

krushik exhibition
एक एकारात 43 प्रकारची पिके.. बारामती कृषिक प्रदर्शनात पाहता येणार प्रयोग

पोषणमूल्य आधारित शेतीपद्धतीचे फायदे..

कुटुंबासाठी आवश्यक असणाऱ्या जास्तीत जास्त अन्नधान्यांचे उत्पादन आपल्याला शेतीतून घेता येऊ शकते. या प्रयोगातून एकापेक्षा अधिक पिके उपलब्ध झाल्यामुळे सर्व प्रकारच्या अन्नधान्यांचा आहारात समावेश होईल. कुटुंबाच्या पोषणाचा दर्जा सुधारेल, मधुमेह व हृदयरोग यांसह विविध आजारावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण आणता येऊ शकते. तसेच एक पिकपद्धतीमुळे शेतजमिनीचे होणारे नुकसान टळू शकते. कमी क्षेत्र असूनही अधिक अर्थिक नफा मिळविता येऊ शकतो. पोषणमुल्य शेतीपद्धतीमध्ये अधिक पिके असल्यामुळे एका पिकास भाव कमी मिळाला, तरी इतर पिकांमधून अधिक अर्थिक फायदा शेतकऱ्यास मिळू शकतो.

हेही वाचा... 'भाजपची सत्ता असलेल्या राज्यात आम्ही आंदोलकांना कुत्र्यासारखं मारलं'

कृषिक प्रदर्शनात पाहायला मिळणार दुर्मिळ देशी वाण...

या वर्षीच्या कृषिक प्रदर्शनात धान्यामध्ये काळा गहू, बोडका गहू, गवती गहू व खपली गहू इत्यादी देशी वाणाचा समावेश आहे. तसेच भाजीमध्ये उलटी मिरची व फुले ज्योती, मांजरी गोटा वांगी, लाल आणि पांढरी भेंडी, फुले विमुक्ता, देशी गाजर, गुळभेंडी, कसुरी मेथी, आणि कुचकुरली पहावयास मिळणार आहे. कडधान्यांमध्ये काटाळ हरभरा, घेवडा, काळा व हिरवा मुग, पावटा, गोल शेंदाड, कारले, भोपळा, दोडका आदी पिकांचा समावेश आहे.

Intro:Body:एक एकर क्षेत्रात 43 प्रकारची देशी पिके...


बारामती... सुदृड आणि निरोगी असलेली सृष्टी आता रोगग्रस्त होत चालली आहे. शरीरामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे कमी पडत आहेत. त्यामुळे कुपोषण, रक्तदाब, रक्तक्षय, मधुमेहा, हृदयरोग इत्यादी समस्या निर्माण होतात. या प्राप्त स्थितीचा विचार करत बारामती कृषी विज्ञान केंद्राने आधुनिक शेतीबरोबर आता पोषणमुल्य आधारीत शेतीपद्धतीची संकल्पना शेतकऱ्यांमध्ये रुजविण्यास पुढचे पाऊल टाकले आहे. 


 यंदाच्या कृषिक प्रदर्शनात एक एकर क्षेत्रात लागवड केलेल्या पोषणमुल्य आधारित 43 प्रकारच्या देशी पिकांची प्रात्याक्षिके शेतकऱ्यांना पहावयास मिळणार आहे. बारामती-शारदानगर येथे कृषी विज्ञान केंद्रात 16 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या `कृषिक` प्रदर्शनात पोषणमूल्य आधारित शेती पद्धतीलाही विशेष

महत्व दिले आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली  (NARI) नारी उपक्रमांतर्गत युनिसेफच्या माध्यमातून बारामती कृषी विज्ञान केंद्राने १ एकर क्षेत्रावर पोषणमूल्य आधारित 43 प्रकारच्या देशी पिकांची वैशिष्ठपूर्ण लागवड केली आहे.


 संतुलित आहार आणि शेती पद्धतीमध्ये पोषणमूल्य 

आधारित पिकांचा समावेश करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या विविध शेती पद्धतींच्या पर्यायांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत जावी. तसेच याची जागरूकता

होण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना यंदाच्या कृषिक प्रदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डाॅ. सय्यद शाकीर आली यांनी केले आहे. ते म्हणाले,`` संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की फक्त शारीरिक आरोग्य नाही तर मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी देखील आहारामध्ये सर्व घटकांचा योग्य प्रमाणात समावेश असणे गरजेचे आहे. ते पोषणमूल्य आधारित शेती पद्धतीमुळे शक्य होईल.या प्रकल्पांतर्गत बारामतीमधील मळद, गुणवडी व नीरावागज गावातील २०० शेतकऱ्यांना समाविष्ट केले आहे.`` 

.........

पोषणमूल्य आधारित शेतीपद्धतीचे फायदे..


कुटुंबासाठी आवश्यक असणाऱ्या जास्तीत जास्त प्रकारच्या अन्नधान्याचे उत्पादन आपल्याच शेतीतून घेता येते, एकापेक्षा अधिक पिके उपलब्ध झाल्यामुळे 

सर्व प्रकारच्या अन्नधान्याचा आहारात समावेश होईल आणि कुटुंबाच्या पोषणाचा दर्जा सुधारेल, मधुमेह व हृद्यरोगासह विविध आजारावर आपल्याला बऱ्याच 

प्रमाणात नियंत्रण आणता येऊ शकते, एकच एक पिकपद्धतीमुळे शेतजमिनीचे होणारे नुकसान टळू शकते, कमी क्षेत्र असूनही अधिक अर्थिक नफा मिळविता येऊ शकतो, पोषणमुल्य शेतीपद्धतीमध्ये अधिक पिके असल्यामुळे एका पिकास भाव कमी मिळाला, तरी इतर पिकांमधून अधिक अर्थिक फायदा शेतकऱ्यास मिळू शकतो.  

........  


 कृषिकमध्ये पाहायला मिळणार दुर्मिळ देशी वाण...!


धान्यामध्ये काळा गहू, बोडका गहू, गवती गहू व खपली गहू इत्यादी देशी वाणाचा समावेश आहे. तसेच भाजीमध्ये उलटी मिरची व फुले ज्योती, 

मांजरी गोटा वांगी, लाल आणि पांढरी भेंडी, फुले विमुक्ता, देशी गाजर, गुळभेंडी, कसुरी मेथी, आणि कुचकुरली पहावयास मिळणार आहे. कडधान्यांमध्ये

काटाळ हरभरा, घेवडा, काळा व हिरवा मुग, पावटा, गोल शेंदाड, कारले, भोपळा, दोडका आदी पिकांचा समावेश आहे. 

.......Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.