ETV Bharat / city

Sharad Pawar : 'महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्तीचा राजकारणाशी...'; शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं

author img

By

Published : Jul 2, 2022, 7:21 PM IST

Sharad Pawar
Sharad Pawar

महाराष्ट्र राजकीय परिषद बरखास्त करण्यात आली ( Maharashtra Kusti Parishad Dismissal ) आहे. क्रीडा क्षेत्रात अनेक राजकीय लोक आहे. त्याचा राज्याच्या राजकारणाशी कोणताही संबंध नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केलं ( Sharad Pawar On Maharashtra Kusti Parishad ) आहे.

पुणे - भारतीय कुस्तीगीर संघटनेकडून महाराष्ट्रातील कुस्तीगीर परिषद बरखास्त केली ( Maharashtra Kusti Parishad Dismissal ) आहे. या परिषदेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे असून, राज्याच्या दृष्टीने मल्लांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यावर आता शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. क्रीडा क्षेत्रात अनेक राजकीय लोक आहे. पण, कधीही राजकीय दृष्टीने बघितलं नाही. तसेच, राज्यात सुरु असलेल्या राजकारणाशी या बरखास्तीचा काहीही संबंध नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ( Sharad Pawar On Maharashtra Kusti Parishad ) होते.

"ब्रिजभूषण सिंह यांची भेट घेणार" - शरद पवार म्हणाले की, राज्यात अनेक खेळाच्या संस्था आहेत. मी अनेक वर्षापासून अध्यक्ष आहे. मी क्रिकेटचा अध्यक्ष होतो. देशाचा, मुंबईचा आणि जगाचाही होतो. खेळाच्या संघटनेत खेळाडू निवडीत मी लक्ष घालत नाही. त्या क्षेत्रातील जाणकारांनी काम पाहावे हे मी करत होतो. त्यांना जर काही अडचणी आल्या किंवा शासकीय मदतची गरज भासली तर मी मदत करायचो. क्रीडा शेत्रात अनेक राजकीय लोक आहे. पण, कधीही राजकीय दृष्टीने बघितलं नाही. राज्यात सुरु असलेल्या राजकारणाशी या बरखास्तीचा काहीही संबंध नाही. तसेच, याबाबत दिल्लीवर गेल्यावर परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांची भेट घेणार असल्याचं यावेळी पवार यांनी सांगितलं आहे.

"...म्हणून कुस्तीगीर संघटना बरखास्त" - कुस्तीगीर परिषदेच्या काही तक्रारी पुणे जिल्ह्यात आल्या. काही तक्रारी राष्ट्रीय संघटनेत गेली. त्यांनतर हा बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. मी आज राष्ट्रीय पातळीवर मी चौकशी केली, तर त्यांनी सांगितले, राज्याच्या संघटनेच्या कार्यपद्धतीच्या काही तक्रारी आल्या होत्या. महाराष्ट्र संघटनेने राष्ट्रीय स्पर्धा भरविण्यात जी पाऊले उचलली पाहिजे होती ते उचलली नाही, म्हणून त्यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त केली आहे. या निर्णयामुळे जे खेळाडू आहे. त्यांच्या खेळावर कसलाही परिणाम होणार होणार नाही. याची देखील खबरदारी मी वैयक्तिक पातळीवर घेईल, असं पवार यांनी म्हटलं आहे.

"त्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या" - राष्ट्रीय पातळीवर जो निर्णय घेण्यात आला आहे, त्यात म्हटलं की, राज्यातील मल्ल या स्पर्धेत आले नाही. मी याबाबत बाळासाहेब लांडगे आणि अन्य लोकांशी बोलेल. ज्या काही तक्रारी करण्यात आल्या आहेत त्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असून, त्याची दखल आम्ही घेणार. ज्या कोणी तक्रारी दिल्या आहेत त्यांची देखील काय पार्श्वभूमी आहे, याचा देखील तपास केला जाणार आहे, असं देखील पवार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Maharashtra Kusti Parishad : बाळासाहेब लांडगे आणि मुलाने कुस्तीगीर परिषदेत भ्रष्टाचार केला; संदीप भोंडवेंचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.