ETV Bharat / city

दिवाळीचे साहित्य बाजारात दाखल,नागरिकांची गर्दी वाढली;पहा ईटीव्ही भारत'वर खास फोटो

author img

By

Published : Oct 27, 2021, 10:32 AM IST

Updated : Nov 17, 2021, 8:22 PM IST

दिवाळी जवळ आली की, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम, गडकोट किल्ले साकारण्यासाठी बच्चे कंपनीची लगबग सुरू होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पश्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे कोणालाच उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली नाही. पण यंदा कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल झाल्याने बाजारात विविध किल्ह्यांसह मावळे तसेच विविध वस्तू खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. याबाबद आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी-

दिवाळीचे साहित्य बाजारात दाखल
दिवाळीचे साहित्य बाजारात दाखल

पुणे - दिवाळी जवळ आली की छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम तसे संघर्षातून उभे राहिलेले गडकोट साकारण्यासाठी बच्चे कंपनीची लगबग सुरू होते. गेल्या काही वर्षात गड कोटासाठी लागणारे माती दगड विटा कधी साहित्य सहज उपलब्ध होत असल्याने चिमुकल्यांच्या पालकांचा ओढा किल्ल्यांचे तयार प्रतिकृती खरेदीकडे वाढत आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पश्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोणालाच उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली नाही. पण यंदा कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल झाल्याने बाजारात विविध किल्ह्यांसह मावळे तसेच विविध वस्तू खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. बाजारपेठ ग्राहकांनी फुलले असल्याने यंदाची ही दिवाळी ही गोड होणार असल्याच यावेळी व्यापारी ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे. याबाबद आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी-

दिवाळीचे साहित्य बाजारात दाखल

दिवाळीचे साहित्य बाजारात दाखल झाले आहे. याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी-
बाजारात 12 इंचापासून ते तीन फुटांपर्यंत किल्ले दाखल

दिवाळीजवळ आली की माती आणण्यापासून किल्ल्यांसाठी जागा निवडणे त्याचा आकार ठरवणे वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती गोळा करून त्याचा इतिहास जाणून घेणे व त्यांनंतर योग्य किल्ला तयार करणे असे बच्चे कंपनीचे नियोजन सुरू होत होते. मात्र, वाढत्या शहरीकरणानंतर फ्लॅट संस्कृती तसेच किल्ल्यांसाठी लागणारी माती, दगड विटा आदी गोष्ट सहज उपलब्ध होत नसल्याने तयार किल्ले खरेदी करण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. पुण्यातील कुंभार वाडा येथे सद्यस्थितीत बाजारात 12 इंचापासून ते तीन फुटांपर्यंत किल्ले दाखल झाले आहेत. त्याच पद्धतीने विविध पोशाखात मावळे, हत्ती, घोडे त्याच पद्धतीने विविध आकारात बनवलेले पणत्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत.

दिवाळीचे साहित्य बाजारात दाखल

यंदाची दिवाळी होणार गोड

कोरोनाच्या पश्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच दुकाने बंद असल्याने अनेक अडीअडचणीला सामोरे जावं लागलं आहे. माल असूनही तो विकता येत नव्हता. बनवलेला माल अशाच पद्धतीने ठेवण्यात आले होते. लॉकडाउन आणि निर्बंध लावल्याने दुकानेच सुरू करता येत नव्हती. पण यंदा रुग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्याने ग्राहकांची रेलचेल सुरू झाली आहे. ग्राहक हे विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी करत आहे. त्यामुळे आमची यंदाची दिवाळी ही गोड होणार असल्याची माहिती यावेळी कुंभारड्यातील व्यापाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा - Aryan Khan Drug Case - आर्यन खानच्या जामिनावर आज पुढील सुनावणी होणार

Last Updated :Nov 17, 2021, 8:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.