पुणे एअरपोर्टवर घुसखोरी करणाऱ्या २ जणांना केंद्रीय सुरक्षा पथकाकडून अटक

author img

By

Published : May 12, 2022, 5:10 PM IST

पुणे एअरपोर्टवर घुसखोरी करणाऱ्या २ जणांना केंद्रीय सुरक्षा पथकाकडून अटक

विमानतळावरील प्रवेशद्वारातून दोघे जण जात होते. त्या वेळी सीआरपीएफचे उपनिरीक्षक मीना यांनी दोघांना तिकिट दाखविण्यास सांगितले. दोघांनी मोबाइलमध्ये तिकिट असल्याचे सांगितले. त्यांनी माेबाइलमध्ये दाखविलेल्या पुणे ते जयपूर प्रवासाच्या तिकिटाची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिकिट बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पुणे - एअरपोर्टवर घुसखोरी करणाऱ्या दोन जणांना केंद्रीय सुरक्षा पथकाने अटक केली आहे. केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील उपनिरीक्षक गुलझारी मीना यांनी याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गौतम अरविंद शिंदे (वय २१) आणि महंमद अमान देसाई (वय २१) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. शिंदे आणि देसाई दोघे तरुण महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. मैत्रिणीला निरोप देण्यासाठी या तरुणांनी थेट विमानतळाच्या आवारात बेकायदा प्रवेश केला होता.

काय आहे प्रकरण - या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीला जाणाऱ्या मैत्रिणीला निरोप देण्यासाठी हे दोघेही पुणे विमानतळावर आले होते. त्यांची मैत्रीण दुपारी विमानाने दिल्लीला जाणार होती. तिला निरोप देण्यासाठी शिंदे आणि देसाई विमानतळाच्या आवारात गेले. विमानतळावरील प्रवेशद्वारातून दोघे जण जात होते. त्या वेळी सीआरपीएफचे उपनिरीक्षक मीना यांनी दोघांना तिकिट दाखविण्यास सांगितले. दोघांनी मोबाइलमध्ये तिकिट असल्याचे सांगितले. त्यांनी माेबाइलमध्ये दाखविलेल्या पुणे ते जयपूर प्रवासाच्या तिकिटाची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिकिट बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.