ETV Bharat / city

भाजपा हे शेतकरी विरोधी, हा देश कृषीप्रधान देश आहे भाजपा विचाराचा नाही - नाना पटोले

author img

By

Published : Oct 5, 2021, 8:23 PM IST

Updated : Oct 5, 2021, 8:53 PM IST

nana
nana

भाजपा हे शेतकरी विरोधी आहे. हे लखीमपूर येथे झालेल्या घटनेतून जाहीर झाले आहे. हा देश कृषी प्रधान देश आहे, भाजपा विचाराचा देश नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात बोलत होते.

पुणे - लखीमपूर भागात शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक करुन सीतापूरमध्ये बंदिस्त करुन ठेवले होते. त्याच्या निषेधार्थ काल संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करून आम्ही थांबलो नाही तर आज (मंगळवारी) तालुक्या तालुक्यात काँग्रेसच्यावतीने आंदोलन सुरु होती. पुण्यात देखील काल सर्वपक्षीय आंदोलन झाले आहे. काँग्रेस लोकसभेत आणि राज्यसभेत तिन्ही काळ्या कायद्याविरोधात ठाम होती. कोण बाहेर गेले कोण कुठे गेले हे सर्वांना माहित आहे. शेतकऱ्यांना संपवण्याचा जो विचार आज भाजपा करत आहे. त्याला विरोध करण्यासाठी सर्व पक्षीय सहभागी झाले होते. भाजपा हे शेतकरी विरोधी आहे. हे लखीमपूर येथे झालेल्या घटनेतून जाहीर झाले आहे. हा देश कृषी प्रधान देश आहे, भाजपा विचाराचा देश नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात बोलत होते.

नाना पटोले

'नव्या प्रभाग पद्धतीचा कोणाला फायदा होणार आहे हे लोक ठरवणार'

सरकार आणि संघटन हे वेगवगेळ भाग आहे. आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून जे काही जनतेचे मत होते ते सरकारसमोर मांडले होते. २ चा प्रभाग झाला असता तर लोकप्रतिनिधी त्या त्या भागात पोहचले असते. मोठे प्रभाग झाल्याने लोकप्रतिनिधी आणि लोक यांच्यातील संवाद तुटतो. ही भूमिका आम्ही सरकार समोर मांडली होती. सरकारला जे मनी होत ते निर्णय त्यांनी घेतले. आम्ही लोकशाही पद्धतीने सरकारसमोर मुद्दा मांडला होता. ३ च्या प्रभागाचा कोणाला फायदा होणार आहे, हे लोक ठरवणार आहे. निवडणुकीच्या नंतरच ते कळणार आहे, असे देखील यावेळी पटोले म्हणाले.

हेही वाचा - Lakhimpur Kheri Violence : जमावबंदी आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना यूपी पोलिसांकडून अटक

Last Updated :Oct 5, 2021, 8:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.