ETV Bharat / city

Chargesheet Against Kiran Gosavi : किरण गोसावीविरोधात दोषारोपपत्र, नोकरीचे आमिषाखाली केली होती फसवणूक

author img

By

Published : Feb 16, 2022, 8:29 AM IST

Kiran Gosavi
Kiran Gosavi

ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावी याच्याविरुद्ध नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे तीन गुन्हे पुण्यात दाखल होते. त्यातील फरासखाना आणि लष्कर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात किरण गोसावी याच्याविरुद्ध नुकतेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे गोसावी याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पुणे - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावी याच्याविरुद्ध नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे तीन गुन्हे पुण्यात दाखल होते. (Chargesheet filed against Kiran Gosavi) त्यातील फरासखाना आणि लष्कर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात किरण गोसावी याच्याविरुद्ध नुकतेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे गोसावी याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती

(2018)मध्ये गोसावी याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी असण्यासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. (Chargesheet filed Kiran Gosavi) त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्याला मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार होता. त्यामुळे फसवणुकी संदर्भात फरासखाना पोलीस किरण गोसावीचा शोध घेत होते.

दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसविले आहे

तक्रारदार चिन्मय देशमुख याच्या माहितीनुसार गोसावीने आपल्यासह पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसविले आहे. या फसवणुकीच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी गोसावी व त्याच्या साथीदारांवर ३५० पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्याचप्रमाणे लष्कर पोलिसांनीही ५० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

हेही वाचा - Built Charging Bike In Nanded : नांदेडच्या शेतकऱ्याचे ग्रामीण टॅलेंट; बनवली चॅर्जिंगवरील दुचाकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.