ETV Bharat / city

Daund MLA Rahul Kul : राहुल कुल यांनी 18 कोटी देण्याचे मान्य केले अन् आरोपी जाळ्यात!

author img

By

Published : Jul 21, 2022, 9:26 AM IST

Daund MLA Rahul Kul : आमदार कुल यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यास हा प्रकार सांगितला. यानंतर याप्रकरणात मुबंई पोलिसांनी वेशांतर करून, हॉटेल ऑबेरॉय येथे एका आरोपीला अटक केली आहे. ( Daund MLA Rahul Kul ) चौकशी दरम्यान आणखी 3 आरोपींची नावे समोर आली आहे. आमदार राहुल कुल यांच्या सतर्कतेमुळे मंत्रिपदासाठी 100 कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या 4 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

दौंडचे आमदार राहुल कुल
दौंडचे आमदार राहुल कुल

दौंड - दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या सतर्कतेमुळे मंत्रिपदासाठी 100 कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या 4 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ( Daund MLA Rahul Kul ) बीजेपी पक्षातील मोठया माणसाच्या संपर्कात असल्याची बतावणी करत, महाराष्ट्र शासनाच्या नविन मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळण्याकरिता 100 कोटी रुपयांची मागणी आमदार कुल यांना करण्यात आली होती. ( Daund Police ) मात्र, आमदार कुल यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यास हा प्रकार सांगितला. यानंतर याप्रकरणात मुबंई पोलिसांनी वेशांतर करून, हॉटेल ऑबेरॉय येथे एका आरोपीला अटक केली आहे. चौकशी दरम्यान आणखी 3 आरोपींची नावे समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या राज्यात भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर नवीन सरकार स्थापन झाले आहे. यामुळे अनेक जणांना नवीन मंत्रिमंडळात मंत्रीपदाची संधी मिळणार आहे. दौंडचे आमदार राहुल कुल हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. यामुळे कुल यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कुल यांच्या सोबतच आणखी काही आमदारांची मंत्रिपदासाठी नावे चर्चेत आहेत. आमदार कुल यांच्यासोबत आणखी 3-4 आमदारांना या आरोपींनी संपर्क केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांची भेट - आरोपीने आमदारांना विश्वास बसावा म्हणून फोनवर दिल्लीतून आलो, असल्याचे सांगत आमदार राहुल कुल यांना बायोडेटाबद्दल बोलायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर 2-3 वेळा आमदार कुल यांना दूरध्वनी करून मी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असून मंत्रीमंडळात मंत्रीपद देण्यासाठी 100 कोटी रुपये मागितल्याचे सांगितले. त्यानंतर 17 जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली. मंत्रीमंडळात सहभागासाठी 90 कोटी रुपये मागितले. त्यात 20 टक्के रक्कम म्हणजे 18 कोटी रुपये उद्या द्यावे लागतील, असे आमदार कुल यांना सांगितले होते. मात्र हा सगळा प्रकार हा फसवणुकीचा असल्याचे आमदार राहुल कुल यांच्या लक्षात आले आहे. कुल यांनी हा सर्व प्रकार राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यास सांगितले आहे. यानंतर हा सर्व प्रकार क्राईम ब्रँचचे जॉईंट कमिशनर यांना सांगितला. मुबंई क्राईम ब्रँचचे पोलीस साध्या वेशात आमदार आणि आरोपीच्या भेटीच्या ठिकाणी होते.

साध्या वेशातील पोलीस ऑबेरॉय हॉटेलात - रियाज अल्लाबक्ष शेख नावाचा आरोपी ऑबेरॉय हॉटेल येथे पैसे घेण्याकरिता आला. आमदार राहुल कुल व आमदार जयकुमार गोरे हे रियाज शेख याच्यासोबत ऑबेरॉय हॉटेलच्या कॅफेटेरीयामध्ये बसले होते. साध्या वेशातील पोलीस ऑबेरॉय हॉटेल येथे आले व त्यांनी रियाज शेख यास चौकशी करिता ताब्यात घेतले. चौकशीनंतर आणखी 3 आरोपींची नावे पोलिसांना समजली आहेत.

फसवणुकीचा गुन्हा दाखल - एका आमदाराच्या सचिवाने दिलेल्या तक्रारीनुसार मुंबई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रियाज अल्लाबक्ष शेख ( वय - 41) कोल्हापूर, योगेश मधुकर कुलकर्णी ( वय- 57) पाचपाखाडी- ठाणे, सागर विकास संगवई ( वय- 37) पोखरण रस्ता- ठाणे व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी ( वय- 53 ) नागपाडा मुंबई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा - Mumbai Crime : मोबाइलमध्ये गेम खेळण्याच्या नावाने 'गुगल पे'मधून गायब केले 22 लाख रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.