ETV Bharat / city

Congress Agitation in Pune : पाच राज्यांतील निवडणुकीनंतर देशात सातत्याने महागाईत वाढ - बाळासाहेब थोरात

author img

By

Published : Apr 1, 2022, 1:51 PM IST

Updated : Apr 1, 2022, 5:46 PM IST

Congress Agitation in Pune
बाळासाहेब थोरात व अन्य कॉंग्रेस नेते

पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर देशात सातत्याने महागाई वाढत आहे. भाजप हे जनतेशी राजकारण करत आहे. जनतेचं काम करत नाहीये, अशी टिका काँग्रेसचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Congress leader Balasaheb Thorat Criticised BJP ) यांनी केली आहे. ( Congress Agitation against rising inflation )

पुणे - आज देशातील प्रत्येकाचे जनजीवन हे महागाईने कठीण होत चालल आहे. रोजच्या जेवणाच प्रश्न तयार होताना दिसत आहे. आज प्रत्येकाचे आर्थिक हिशोब हे कोंडमडला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर देशात सातत्याने महागाई वाढत आहे. भाजप हे जनतेशी राजकारण करत आहे. जनतेचं काम करत नाहीये, अशी टिका काँग्रेसचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ( Congress leader Balasaheb Thorat Criticized BJP ) केली आहे. केंद्रातील मोदी सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लूट करीत आहे. या महागाई विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने अलका टॉकीज चौक येथे काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत "महागाई मुक्त भारत" आंदोलन करण्यात ( Congress Agitation against rising inflation ) आले. यावेळी महागाईची गुढी उभारून भाजपचा निषेध व्यक्त करण्यात आला.

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

त्यांना शोधून काढले पाहिजे - देशात भारतीय जनता पक्षाची सरकार आल्यापासून सातत्याने महागाईमध्ये वाढ होत आहे.आमचं सरकार आणा स्वस्थाई आणू अस जे आश्वासन देण्यात आले होते. त्याचं काय झाले. जे आश्वासन दिले होते ते तर पूर्ण केले नाही पण महागाई वाढवली आहे. गोरगरीब जनतेच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रकार हा भाजपने 2014 पासून सुरू केले आहे. या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्यावतीने देशभर आंदोलन करण्यात येत आहे. भाजपचे जे नेते एक रुपया जरी महागाईमध्ये वाढ झाली तरी रस्त्यावर यायचे ते आता कुठे लपून बसले आहे. त्यांना शोधून काढले पाहिजे, असे यावेळी थोरात यांनी सांगितले.

Congress Agitation in Pune
बाळासाहेब थोरात व अन्य कॉंग्रेस नेते

कोणीही नाराज नाही - काँग्रेसचे 25 आमदार हे राज्यातील महाविकास आघाडीवर नाराज आहे.यावर थोरात यांना विचारलं असता ते म्हणाले की कोणीही नाराज नाही. 5 आणि 6 तारखेला सर्वपक्षीय आमदारांची प्रशिक्षण शिबीर आहे आणि त्याला आमचेही आमदार जाणार आहे. त्यांना वाटत आहे की आपल्या नेतृत्वाला भेटावे म्हणून ते जात आहे. तसो पत्र देखील दिले आहे. याचा विपर्यास केला जात आहे, असे देखील यावेळी थोरात म्हणाले.

हेही वाचा - LPG price hiked : महागाईच्या झळा! एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर 250 रुपयांची वाढ

Last Updated :Apr 1, 2022, 5:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.