Pune Bulli Bai Case : लहान मुली आणि महिलांचे फोटो अश्लीलरित्या वापरले, आरोपी अटकेत

author img

By

Published : Jan 12, 2022, 6:43 PM IST

Khadki

खडकी परिसरात देखील बुली बाईसारखं प्रकरण (Bulli Bai case) घडल्याची माहिती समोर येत आहे. परिसरात राहणाऱ्या महिलांचे व मुलींचे फोटो काढत ते अश्लील बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खडकी पोलीसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

पुणे - खडकी परिसरात देखील बुली बाईसारखं प्रकरण (Bulli Bai case) घडल्याची माहिती समोर येत आहे. परिसरातील महिलांचे व मुलींचे फोटो काढत ते अश्लील बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खडकी पोलीसांनी एका तरुणाला अटक केली आहे. खडकीत राहत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाने हे कृत्य केले असून ९ जानेवारी रोजी हा प्रकार घडला आहे. खडकी पोलीस स्टेशनमध्ये १० जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांची प्रतिक्रिया
काय आहे प्रकरण
आरोपीने तो राहत असलेल्या परिसरातच महिला आणि अल्पवयीन मुलींचे फोटो, व्हिडिओ स्वतःच्या मोबाईल मध्ये काढले. आणि नंतर त्याला अश्लीलरित्या एडिट करत ते सोशल मीडियावर व्हायरल केलं. आणि हा तरुण २०१९ पासून हे कृत्य करत असल्याचे उघड झाले आहे. या आरोपींकडून वेगवेगळे मोबाईल जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे तपास सुरू आहे. आतापर्यंत १८ वर्षा खालील ४ मुलींची तर तीन महिलांची नावे समोर आली आहेत.
इतर देशांचे व्हॉट्सअप ग्रुप या आरोपीच्या व्हाट्सअप मध्ये ब्राझील, पाकिस्तान या देशांसह अन्य अनेक देशांचे व्हाट्सअप ग्रुप बनलेले आहेत आणि याच गृपवर त्याने हे सारे फोटो आणि व्हिडिओ पाठवल असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
१५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर ३५४ क आणि ४६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यालयाने त्याला १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती खडकी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.