ETV Bharat / city

Pune : सावकारी जाचाला कंटाळलेल्या पुण्यातल्या 'त्या' वयोवृध्द महिलेला न्याय नाहीच

author img

By

Published : Mar 8, 2022, 3:39 PM IST

65-year-old Anusaya Patole harassment of money lender  in pune
Pune : सावकारी जाचाला कंटाळलेल्या पुण्यातल्या 'त्या' वयोवृध्द महिलेला न्याय नाहीच

काही दिवसापूर्वी पुण्यातील एका 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेवर सावकाराच्या ( 70 year old Anusaya Patole ) हव्यासापोटी भीक मागण्याची वेळ आली असल्याची धक्कादायक घटना उघड झाली होती. यासंदर्भात अनेक माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या प्रकरणातील आरोपीला अटक झाली आणि त्याला जामीन देखील मिळाला आहे. पण त्या आजीला अद्याप न्याय भेटलेला नाही.

पुणे - काही दिवसांपूर्वी सर्व समाज माध्यमांवर पुण्यातील एका 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेची ( 70 year old Anusaya Patole ) बातमी दाखवली होती. पुण्यातील एका 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेवर सावकाराच्या हव्यासापोटी भीक मागण्याची वेळ आली असल्याची धक्कादायक घटना उघड झाली होती. पुण्यातील ( Anusaya Patole in Pune) गुरुवार पेठेत राहणाऱ्या 70 वर्षीय अनुसया पाटोळे ( Anusaya Patole in Pune) या अजीच्या पुतण्याने बेकायदेशीर सावकारकीच्या माध्यमातून 40 हजार कर्ज घेणाऱ्या स्वतःच्याच अजीकडून 8 लाखापेक्षा जास्त पैसे वसूल केले आणि आजीवर भीक मागण्याची वेळ आली. यासंदर्भात अनेक माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

पुण्यातील एका 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेवर सावकाराच्या हव्यासापोटी भीक मागण्याची वेळ
न्याय नाहीच -या प्रकरणातील आरोपीला अटक झाली आणि त्याला जामीन देखील मिळाला आहे. पण त्या महिलेला न्याय भेटला आहे का? त्या जाचातून तिची सुटका झाली आहे का? याकडे कुणाचाच लक्ष गेलं नाही. नेमकी त्या महिलेची आजची परिस्थिती काय आहे? त्या सावकाराने तिला त्रास द्यायचा बंद केला आहे का? हे सगळ बघण्यासाठी ईटीव्ही भारत पुन्हा त्या महिलेकडे गेलं अणि सार काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा एवढे दिवस उलटून देखील अनुसया पाटोळे यांना न्याय मिळाला नाही. हेच सत्य असल्याचे समोर आले आहे. काय आहे प्रकरण?70 वर्षाच्या अनुसया पाटोळे या वयोवृद्ध महिलेने पाच वर्षांपूर्वी नातीच्या उपचाराकरीता 10 टक्के व्याजदराने 40 हजार रुपये आरोपी दिलीप विजय वाघमारे यांच्याकडून घेतले होते. त्या बदल्यात महिलेने बँकेतून लोन काढून आरोपीस मुद्दल 40 हजार रुपये व्याजापोटी 1 लाख रुपये दिले होते. त्यानंतर आरोपी वाघमारे याने या वयोवृद्ध महिलेच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेवून आणखी व्याज आहे, असे सांगून वृद्ध महिलेचे दोन एटीएम कार्ड पासबूक घेतले. आणि त्या एटीएमवर जमा होणारी पेन्शनची रक्कम एकूण 16 हजार 344 रुपये महिना काढून घेऊन तिला महिन्याला मोजकीच 2 हजार रुपये देत होता. असे त्याने पाच वर्षांपासून ते आतापर्यंत एकूण 8 लाख रुपये बेकायदेशीर व्याजासहीत वसूल करून आणखी देणे लागत असल्याचे सांगून एटीएम कार्ड, पासबूक देण्यास नकार दिला. परंतु अजूनही न्याय मिळाला नाही आणि आता त्यांच्या अडचणी अजूनही वाढतच आहेत.

हेही वाचा - Goa Assembly Election : गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, डाॅ. सावंत दिल्लीत तर चिदंबरम गोव्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.