ETV Bharat / city

Ganesh Chaturthi 2022: महागाईचा फटका...यंदा बाप्पाच्या लाडक्या मोदकाच्या किंमतीत 5 टक्के वाढ

author img

By

Published : Sep 1, 2022, 2:43 PM IST

Pistachio Modak
पिस्ता मोदक

बाप्पाचा लाडका प्रसाद म्हणजे मोदक ( Bappas Beloved Modak ). सध्या बाजारात अनेक प्रकारचे मोदक हे दाखल झाले असून पुण्यातील काका हलवाई ( kaka Halwai Sweet Centre pune ) येथे 10 प्रकारचे मोदक आणि 100 ग्राम ते 200 किलो पर्यंत मोदक तयार करण्यात आल्या आहे.

पुणे - गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले.यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वच सण उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असून उत्सवावर आधारित असलेले अनेक व्यापारी वर्गांला देखील यंदाचा गणेशोत्सवात अच्छे दिन आले आहे. बाप्पाचा लाडका प्रसाद म्हणजे मोदक.सध्या बाजारात अनेक प्रकारचे मोदक हे दाखल झाले असून पुण्यातील काका हलवाई ( kaka Halwai Sweet Centre pune ) येथे 10 प्रकारचे मोदक आणि 100 ग्राम ते 200 किलो पर्यंत मोदक तयार करण्यात आल्या आहे.

यंदा बाप्पाच्या लाडक्या मोदकाच्या किंमतीत 5 टक्के वाढ



10 प्रकारचे मोदक उपलब्ध - गेली 2 वर्ष प्रत्येक घटकाला कोरोनाचा फटका बसला आहे पण यंदा निर्बंध मुक्त झाल्याने यंदाच्या गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणत नागरिक लाडक्या बाप्पाच्या प्रसादासाठी मोदक खरेदीसाठी गर्दी करत आहे. आमच्या इथ 10 प्रकारचे मोदक हे तयार करण्यात आले आहे त्यात पंचखाद्य मोदक, उकडीचे मोदक, चॉकलेट मोदक, तसेच मावा मोदक असे विविध प्रकारचे मोदक तयार करण्यात आले आहे. अशी माहिती यावेळी काका हलवाई चे मालक युवराज गाढवे यांनी दिली.



एका भक्ताने दिली 200 किलो मोदक ची ऑर्डर - पुण्यातील काका हलवाई येथे 100 ग्राम ते 200 किलो पर्यंत मोदक हे तयार केले जातात. गणेशोत्सवात भाविकांकडून बप्पाच्या चरणी प्रसाद म्हणून मोदक दिला जातो यंदा काका हलवाई ( kaka Halwai Sweet Centre pune ) येथे एका भक्ताने आपल्या लाडक्या बाप्पासाठी 200 किलोच मोदक ऑर्डर केला आहे.आणि त्याचे काम देखील सुरू आहे.



महागाईचा फटका - गेली काही महिन्यांपासून वाढत असलेल्या महागाई चा फटका यंदाच्या गणेशोत्सवावर बसला असून मोदकच्या किमतीमध्ये 2 ते 5 टक्के एवढी वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे कच्च्या तेलाचे किंमती मध्ये झालेली वाढ, पेट्रोल डिझेल मध्ये झालेली वाढ याचा देखील फटका यंदा मोदक च्या किंमतीवर झाला आहे.

हेही वाचा Ganesh Chaturthi 2022 : 'या' शहरात भरते गणरायाचे 'कोर्ट'; निकाली निघतात अनेक खटले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.