ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : पणजीत भाजपने गड राखला; उत्पल पर्रीकर पराभूत

author img

By

Published : Mar 10, 2022, 12:02 PM IST

पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांच्यातील लढतीकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले होते. भाजपने पणजीतून तिकीट नाकारल्याने उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मात्र, त्यांना भाजपला टक्कर देण्यात अपयश आले आहे. पणजीत बाबूश मोन्सेरात यांनी भाजपचा गड राखला आहे.

उत्पल पर्रीकर
उत्पल पर्रीकर

पणजी - पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांच्यातील लढतीकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले होते. भाजपने पणजीतून तिकीट नाकारल्याने उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मात्र, त्यांना भाजपला टक्कर देण्यात अपयश आले आहे. पणजीत बाबूश मोन्सेरात यांनी भाजपचा गड राखला आहे. पणजीत भाजप समर्थक जल्लोष करत आहेत, तर उत्पल पर्रीकर यांच्या गोटात शांतता आहे.

उत्पल पर्रिकर

उत्पल काय म्हणाले

"अपक्ष उमेदवार म्हणून ही एक चांगली लढत होती, मी लोकांचे आभार मानतो. लढतीबद्दल समाधानी आहे, परंतु निकाल थोडासा निराशाजनक आहे," दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना म्हणाले.

हेही वाचा - Goa elections : अभिषेक बनर्जी, प्रशांत किशोर, डेरेक ओ ब्रायन गोव्यात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.