ETV Bharat / city

गोव्यात अॅपबेस्ड टॅक्सीसेवा राहणार सुरूच : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

author img

By

Published : Aug 1, 2019, 8:07 AM IST

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन

गोवा पर्यटन विकास महामंडळाने 'गोवा माईल्स' नावाने कंत्राटदाराकरवी हाताळली जाणारी अॅपबेस्ड टॅक्सी सेवा सुरू केली. याला स्थानिक टॅक्सी संघटनांकडून विरोध करण्यात आला. यामुळे या वादावर मागील अनेक दिवसांपासून तोडगा काढावा, अशी मागणी केली जात होती. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, दादागिरीची भाषा कोणी करू नये, सरकार नेहमीच सहकार्याला तयार आहे. आम्हाला 'गोवा माईल्स'ची नव्हे तर गोमंतकियांच्या हिताची चिंता आहे.

पणजी - स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. त्यामुळे गोव्यात अॅपबेस्ड टॅक्सी सेवा सुरूच राहणार आहेत. अशावेळी स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी अॅपबेस्ड सेवा सुरू केली, तर गोवा पर्यटन विकास महामंडळाने सुरु केलेल्या अॅपबेस्ड सेवेबरोबर त्यालाही प्रोत्साहन देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. अॅपबेस्ड टॅक्सी सेवा वादावर तोडगा काढण्यासाठी बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी यावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली होती.

सध्या गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये सोमवारी गोमंतकीय टॅक्सी व्यावसायिकांच्या विविध संघटनांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव, काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानुसार बुधवारी सभागृहात चर्चा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.

गोवा पर्यटन विकास महामंडळाने 'गोवा माईल्स' नावाने कंत्राटदाराकरवी हाताळली जाणारी अॅपबेस्ड टॅक्सी सेवा सुरू केली. याला स्थानिक टॅक्सी संघटनांकडून विरोध करण्यात आला. यामुळे या वादावर मागील अनेक दिवसांपासून तोडगा काढावा, अशी मागणी केली जात होती.


आज सभागृहात झालेल्या चर्चेत सहभागी आमदारांनी गोमंतकीय टॅक्सी व्यावसायिकांचे हीत जपण्याची मागणी केली. याविषयी मुख्यमंत्री म्हणणे समजून घ्यायला तयार नसल्याची भूमिका घेत काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड सभापतींच्या समोर गेले. त्यामुळे थोडीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सभागृहाचा त्याग केला. तर सत्ताधारी आपल्या मागणीला विरोध करत आहे हे दिसत असूनही आलेमाव शेवटपर्यंत सभागृहात हजर होते.

goa
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन


मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गोव्यात काही मोजकेच लोक टॅक्सी व्यवसाय करतात. यामध्ये 2559 रेन्ट अ कॅब आणि 18 हजार नोंदणीकृत रेन्ट अ बाईक आहेत. हे प्रमाण का वाढले कारण टॅक्सीचे दर पर्यटकांना न परवडणारे वाटतात. अशा वेळी पर्यटन खात्याने गोवा माईल्स अॅप आणला आहे. कारण नवे तंत्रज्ञान वापरल्या शिवाय व्यवसाय वाढवणे शक्य नाही. ही सेवा सुरक्षित आणि किफायतशीर आहे. जे गोमंतकीय टॅक्सी चालक अॅप नको म्हणत आहे. त्यांनी किमान तीन महिने हे अॅप वापरावे. जर त्यांना फायदा होत नसल्याचे दिसत असेल तर सरकारला सांगावे. अथवा त्यांना हवा तसा अॅप तयार करावा. त्यालाही सरकार प्रोत्साहन देण्यासाठी तयार आहे.


2015 मध्ये सरकारने सांगितल्यानुसार जर डिजिटल मीटर बसवले असते तर आज ही वेळ आलीच नसती, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, आता टॅक्सी व्यावसायिक डिजिटल मीटर बरविण्यासाठी तयार होत आहेत. परंतु, यामध्ये सुरक्षा नाही. जर ही अॅपसेवा घेतली तर डिजिटल मीटर बसविण्याची गरज नाही. शिवाय सरकार या टॅक्सीधारकांना किमान व्यवसाय कसा मिळेल याचीही तरतूद करणार आहे. गोव्यातील पर्यटन उद्योग वाढण्याबरोबरच हा व्यवसाय प्रदीर्घ चालावा यासाठी अॅपबेस्ड सेवा आवश्यक आहे. याला विरोध करण्यासाठी कोणी आंदोलनाच्या पावित्र्यात असू नये. जर आंदोलन झालेच तय त्याला सभागृहातील काही नेते जबाबदार मानले जातील. दादागिरीची भाषा करू नये सरकार नेहमीच सहकार्याला तयार आहे. आम्हाला 'गोवा माईल्स'ची नव्हे तर गोमंतकियांच्या हिताची चिंता आहे.

Intro:पणजी : स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. त्यामुळे गोव्यात अँपबेस्ड टँक्सी सेवा सुरूच राहणार आहे. अशावेळी स्थानिक टँक्सी व्यावसायिकांनी अँपबेस्ड सेवा सुरू केली तर गोवा पर्यटन विकास महामंडळाने सुरु केलेल्या अलपसेवे बरोबर त्यालाही प्रोत्साहन देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. अँपबेस्ड टँक्सी सेवा वादावर तोडगा काढण्यासाठी बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी यावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली होती.


Body:सध्या गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये सोमवारी गोमंतकीय टँक्सी व्यावसायिकांच्या विविध संघटनांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव, काँग्रेसचे आमदाल आलेक्स रेजिनाल्ड यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानुसार आज सभागृहात चर्चा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.
गोवा पर्यटन विकास महामंडळाने ' गोवा माईल्स ' नावाने कंत्राटदाराकरवी हाताळली जाणारी अँपबेस्ड टँक्सी सेवा सुरू केली. त्याला स्थानिक टँक्सी संघटनांकडून सेवेला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या वादावर मागील अनेक महिने तोडगा काढावा, अशी मागणी केली जात होती.
आज सभागृहात झालेल्या चर्चेत सहभागी आमदारांनी गोमंतकिय टँक्सी व्यावसायिकांचे हीत जपण्याची मागणी केली. याविषयी मुख्यमंत्री म्हणणे समजून घ्यायला तयार नसल्याची भुमिका घेत काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड सभापतींच्या समोर गेले. त्यामुळे थोडीशी गोंधळाची स्थीती निर्माण झाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सभागृहाचा त्याग केला. तर सत्ताधारी आपल्या मागणीला विरोध करत आहे हे दिसत असूनही आलेमाव शेवटपर्यंत सभागृहात हजर होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गोव्यात काही मोजकेच लोक टँक्सी व्यवसाय हाताळत आहेत. यामध्ये 2559 रेन्ट अ कँब आणि 18 हजार नोंदणीकृत रेन्ट अ बाईक आहेत. हे प्रमाण का वाढले कारण टँक्सीचे दर पर्यटकांना न परवडणारे वाटतात. अशा वेळी पर्यटन खात्याने गोवा माईल्स अँप आणला आहे. कारण नवे तंत्रज्ञान वापरल्या शिवाय व्यवसाय वाढणे शक्य नाही. ही सेवा सुरक्षित आणि किफायतशीर आहे. जे गोमंतकीय टँक्सी चालक अँप नको म्हणत आहे. त्यांनी किमान तीन महिने हे अँप वापरावे. जर त्यांना फायदा होत नसल्याचे दिसत असेल तर सरकारला सांगावे. अथवा त्यांना हवा तसा अँप तयार करावा. त्यालाही सरकार प्रोत्साहन देण्यासाठी तयार आहे.
2015 मध्ये सरकारने सांगितल्यानुसार जर डिजिटल मीटर बसवले असते तर आज ही वेळ आलीच नसती, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आता टँक्सी व्यावसायिक डिजिटल मीटर बरविण्यासाठी तयार होत आहेत. परंतु, यामध्ये सुरक्षा नाही. तर ही अँपसेवा घेतली तर डिजिटल मीटर बसविण्याची गयज नाही. शिवाय सरकार या टँक्सीधारकांना किमान व्यवसाय कसा मिळेल याचीही तरतूद करणार आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, गोव्यातील पर्यटन उद्योग वाढण्याबरोबरच हा व्यवसाय प्रदीर्घ चालावा यासाठी अँपबेस्ड सेवा आवश्यक आहे. याला विरोध करण्यासाठी कोणी आंदोलनाच्या पावित्र्यात असू नये.जर आंदोलन झालेच तय त्याला सभागृहातील काही नेते जबाबदार मानले जाईल. दादागिरीची भाषा करू नये सरकार नेहमीच सहकार्याला तयार आहे. आम्हाला गोवा माईल्स ची नव्हे तर गोमंतकियांच्या हिताची चिंता आहे.



Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.