ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : गोव्यात संभाजी ब्रिगेडचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

author img

By

Published : Jan 31, 2022, 1:11 PM IST

sambhaji brigade
sambhaji brigade

गोवा विधानसभा निवडणुकीत ( Goa Assembly Election ) संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली ( Sambhaji Brigade On Goa Election ) आहे. ब्रिगेडने आपले तीन उमेदवार घोषित केले ( Sambhaji Brigade Announce Three Candidate ) आहेत. तसेच, निवडणुकीसाठी 26 कलमी कार्यक्रमही जाहीर केला आहे.

गोवा - गोवा विधानसभेच्या निवडणुकीच्या ( Goa Assembly Election ) निमित्ताने संभाजी ब्रिगेड तीन जागांवर ( Sambhaji Brigade On Goa Election ) लढणार आहे. त्यानित्ताने प्रदेशाध्यक्ष रिजनाल्डो डीकोस्टा पक्षाचा जाहीरनामा जनतेसमोर ठेवला आहे. तसेच, गोवा राज्याला चांगला मुख्यमंत्री मिळवून देण्याची ग्वाही रिजनाल्डो डीकोस्टा यांनी दिली आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते रुपेश पाटील, उमेदवार मुकेश नाईक, डायना फर्नांडिस, मारिया डिकोस्टा, मोहम्मद खान, साऊथ गोवाचे जिल्हाध्यक्ष परेश तारी आदी उपस्थित होते.

रिजनाल्डो डीकोस्टा म्हणाले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची व्यवसायिकांच्या विरोधी धोरणे, भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्थाची स्थिती या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेड लोकांना आकर्षित करत आहे. तसेच, या 26 कलमी जाहीर केलेल्या कार्यक्रमात, राज्यातील जनतेसाठी मोफत डॉक्टर आणि मोफत वैद्यकीय सोयी - सुविधा, मोफत कायदेशीर सल्ला आणि मोफत वकील उपलब्ध करून देण्यासह, सरकारी नोकर भरतीत स्थानिकांना शंभर टक्के प्राधान्य आणि अन्य लोकोपयोगी योजना राबवण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रदेशाध्यक्ष रिजनाल्डो डीकोस्टा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

संभाजी ब्रिगेडचा जाहीरनामा

  • भ्रष्टाचारमुक्त गोवा हा पक्षाचा नारा असून, भ्रष्टाचाराला 100% पायबंद घातला जाईल.
  • सरकारी नोकर भरती 100% पारदर्शी करून, स्थानिकांसाठी सर्वच्या सर्व जागा आरक्षित करू. तसेच जास्तीत जास्त सरकारी नोकऱ्यांची निर्मिती करण्याबरोबरच सरकारी उद्योगांचे खाजगीकरणही बंद करू.
  • सर्वात ईमानदार मुख्यमंत्री ही गोवा राज्याची गरज आहे. त्यामुळे ही गरज पूर्ण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड सदैव दक्ष राहील. तसेच ईमानदार मुख्यमंत्री निवडण्यासाठी, वेळप्रसंगी लॉटरी काढावी लागली तर त्यासाठी जो पक्ष तशी भूमिका घेईल. त्या पक्षासोबत आम्ही उभे राहू.
  • गोवा राज्यात शैक्षणिक क्रांती घडवून, सर्वांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि शिक्षण संस्था उभ्या करू.
  • राज्यातल्या सर्वच गावांसाठी अखंड आणि पुरेसा विद्युत पुरवठा करून 200 युनिटपर्यंतची वीज सर्वांना मोफत दिली जाईल.
  • शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत दिली जाईल. तसेच त्यांच्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी शेतीमाल विक्री केंद्रे उभा केली जातील.
  • राज्याच्या विकासासाठी नवे व्हिजन डॉक्युमेंट तयार करून, संबंधित आराखडा तात्काळ अंमलात आणला जाईल.
  • राज्यात दुग्ध क्रांती घडवून, राज्य दुग्ध उत्पादनात स्वयंपूर्ण आणि अग्रेसर बनविणार.
  • रस्ते अपघात नाहीसे करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात नवीन रस्ते, पूल, उड्डाणपूल यांची गरज ओळखून त्यांची निर्मिती करणार. दळणवळणाचा दर्जा सुधारणार, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करून अपघातमुक्त गोवा यासाठी प्रयत्न करणार
  • सरकारी शाळांची संख्या वाढवून सर्व शाळांना अनुदान देणार. तसेच या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करणार
  • विमान सेवा अत्याधुनिक करण्याबरोबरच विमानतळाचा विस्तार आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात विमानसेवा सुरू करणार.
  • शहरातील तसेच गावातील स्वच्छतागृहांची संख्या वाढविणार आणि स्वच्छतागृहाअभावी होणारी गैरसोय बंद करणार.
  • राज्यातील सर्व गावात तसेच प्रत्येक विभागात ई - वाचनालय सुरू करणार.
  • राज्यातील सर्व सरकारी इस्पितळाचा दर्जा सुधारणार तसेच गोरगरिबांना सरकारी कंपन्यांची औषधे मोफत देणार.
  • राज्यातील खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करणार.
  • राज्याचा आर्थिक विकास दर वाढविणार आणि राज्य देशात अग्रेसर बनविणार
  • राज्यातील स्थानिक कलाकारांना आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले जाईल. तसेच कला, क्रीडा, संस्कृतीला चालना देवून गोवा राज्य हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ बनविणार.
  • राज्यातील सर्व अपूर्ण आणि अर्धवट प्रकल्प पूर्ण करू. तसेच आयटी आणि एनआयटी प्रकल्पही पूर्ण केले जातील.
  • राज्यातील सर्व पर्यटनस्थळे आणि समुद्रकिनारे प्लॅस्टिक व कचरामुक्त करण्याबरोबरच जगाला हेवा वाटेल असा राज्यकारभार करू.
  • कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य निर्माण करून भयमुक्त व गुन्हेगारीमुक्त गोवा अशी राज्याची नवी ओळख निर्माण करु.
  • सर्व ऐतिहासिक वारसास्थळांचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण करणार.
  • प्रत्येक गावात भव्य - दिव्य असे खेळाचे मैदान, जॉगिंग ट्रॅक आणि व्यायाम शाळा सुरू करून, सर्व व्यायामशाळांना व्यायामासाठी लागणारे साहित्य मुबलक प्रमाणावर देण्यात येईल.
  • सर्व पंचायतीमध्ये बहुउद्देशीय सभागृहांची निर्मिती केली जाईल.
  • महिलांसाठी स्वयम् रोजगाराची साधने उपलब्ध करून त्यांना भरघोस अर्थसहाय्य केले जाईल.
  • औद्योगीकरणाला चालना देण्यात येईल. तसेच उद्योग आणि व्यापाराचा विस्तार केला जाईल. त्याशिवाय सर्व उद्योजक, व्यापारी यांच्यासह सर्वांच्या उन्नतीचे व प्रगतीचे नवे धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.

हेही वाचा - Parambir Singh Recovery Case : परमबीर सिंहाच्या अडचणीत वाढ, सॉफ्टवेअरद्वारे छोटा शकीलचा आवाज काढून मागितली खंडणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.