ठाकरे पॅटर्न विसरून शिवसेनेची गांधी पॅटर्नकडे वाटचाल - देवेंद्र फडणवीस

author img

By

Published : Oct 13, 2021, 9:08 PM IST

Updated : Oct 13, 2021, 9:32 PM IST

Devendra Fadnavis

लखीमपूर प्रकरणात सरकारने पुकारलेला बंद हा राज्यपुरस्कृत पोलिसबंदोबस्ताखाली दहशत माजविण्यासाठी केलेला बंद होता अशी टीका विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे

पणजी - राज्यात शिवसेना पवारांच्या व गांधी घराण्याच्या नादी लागून आपला ठाकरे पॅटर्न विसरून गांधी पॅटर्नकडे वाटचाल करत आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर प्रकरणी राज्यात पुकारण्यात आलेला बंद हा पोलिसांच्या बंदोबस्ताखाली राज्य पुरस्कृत दहशत निर्माण करण्यासाठी केलेला बंद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहेत. फडणवीस बुधवारपासून गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

ईडी किंवा सीबीआयचा संबंध भाजपशी - फडणवीस

राज्यात ईडी, सीबीआय किंवा एनसीबीने कोणतीही कारवाई केली की त्याचा थेट संबंध भाजपशी जोडला जात असून राज्यात या यंत्रणांना दुय्यम स्थान दिले जात असल्याची खंत फडणवीस यांनी व्यक्त केली.

पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मी विरोधी पक्षनेतेपदी खुश -

आपण मुख्यमंत्री असताना ५ वर्षे यशस्वीरित्या मुख्यमंत्री पद सांभाळले आणि पाच वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यामुळेच शरद पवारांच्या पोटात दुखत असून त्यांनी आपल्यावर टीका केली आहे. असे सांगत आपण मुख्यमंत्री पदाची लालसा न ठेवता विरोधी पक्षनेतेपदी खुश असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हे ही वाचा -भाजपने व संघाने सावरकरांना पुन्हा-पुन्हा अडचणीत आणू नये, जयंत पाटलांचा टोला

राज्यात करण्यात येणारी कारवाई योग्यच -


राज्यात सीबीआय किंवा ईडीला कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळत असून राज्यात सहकार क्षेत्रात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाल्यामुळे या यंत्रणा कारवाई करत आहेत व यात कोणत्याही राजकीय नेत्यांना मुद्दामहून टार्गेट केले जात नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Last Updated :Oct 13, 2021, 9:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.