ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, आमदार चर्चिल आलेमाव तृणमूलमध्ये

author img

By

Published : Dec 13, 2021, 3:21 PM IST

Updated : Dec 13, 2021, 5:37 PM IST

big blow ncp  in  Goa
big blow ncp in Goa

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठा धक्का ( Nationalist Congress Party In Goa ) बसला आहे. राज्यातील पक्षाचे नेते आमदार चर्चिल आलेवाम ( Goa NCP MLA Churchill Alemao ) यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. ( NCP MLA from Goa Entered TMC ) निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यातील नेत्यांनीच पक्षाचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात पक्षाचे एकमेव आमदार असणाऱ्या माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

पणजी - राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठा धक्का (Big blow Nationalist Congress Party in Goa ) बसला आहे. राज्यातील पक्षाचे नेते आमदार चर्चिल आलेवाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. (Nationalist Congress Party merged with Trinamool) केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यातील नेत्यांनीच पक्षाचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात पक्षाचे एकमेव आमदार असणाऱ्या माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव (Goa MLA Churchill Alemao) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तृणमुल काँग्रेसमध्ये विलीन केला आहे. ऐन निवडणुकीच्या (Goa Assembly Election) तोंडावर आमदार चर्चिल आलेमाव यांनी हा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील काही नेते नाराज झाले आहेत.

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

काँग्रेस पक्षाने नाकारल्याने निर्णय- आलेमाव

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच काँग्रेस पक्षासोबत सत्तेत सहभागी व्हायची. मात्र मागच्या दोन टर्ममध्ये काँग्रेस सत्तेपासून दूर राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सत्तेपासून दूर होता. मात्र चर्चिल आलेमाव (Goa MLA Churchill Alemao) यांनी मधल्या काळात भाजपशी जुळवून घेतल्यामुळे नाराज काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने चर्चिल आलेमाव यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का
गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

त्यातच आलेमाव आणि त्यांची कन्या वालांका आलेमाव या 2022 ला अनुक्रमे बाणवली आणि न्हवेलीम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने मागच्या वर्षभरापासून दूर ठेवल्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तृणमूलमध्ये विलीन करून आगामी विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) तृणमूलच्या झेंड्याखाली लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

big blow ncp  in  Goa
big blow ncp in Goa

विधानसभा सभापतींना सादर केले पत्र -

दरम्यान आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तृणमुल काँग्रेसमध्ये त्यांनी विलीन करत असल्याचे पत्र त्यांनी विधानसभा सभापती राजेश पाटनेकर यांना सुपूर्द केला.

Last Updated :Dec 13, 2021, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.