ETV Bharat / city

Problem of widowed women In Nashik नाशिकमधील विधवा महिलांचा प्रश्न गंभीर, कोरोनाने पती गमावलेल्या महिलांसमोर अनेक अडचणींचा डोंगर

author img

By

Published : Aug 20, 2022, 10:29 PM IST

Updated : Aug 21, 2022, 12:03 PM IST

कोरोनाने Covid पती गमावलेल्या महिलांना widowed women अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पतीने घर,गाडी साठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने बँकांकडून कर्ज वसूलीसाठी या विधवा महिलांना त्रास These widows suffer from bank loan recovery देण्याचे प्रकार सुरू आहे.

Problem of widowed women In Nashik
नाशिकमधील विधवा महिलांचा प्रश्न गंभीर

नाशिक - कोरोनाने Covid पती गमावलेल्या महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पतीने घर,गाडी साठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने बँकांकडून कर्ज वसूलीसाठी या विधवा महिलांना त्रास These widows suffer from bank loan recovery देण्याचे प्रकार सुरू आहे, पतीच्या निधनानंतर महिलांकडे उत्पनाचे साधन नसल्याने या महिलांनी सरकारकडे मदतीची Women demanded help from the government केली आहे. कोरोनामुळे अनेकांचे आयुष्य होत्याचे नव्हते झाले,घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर अक्षरशः उघड्यावर आलं आहे. महाराष्ट्रात 50 वयाच्या आतील जवळपास 20 हजारहून अधिक महिला विधवा झाल्या आहेत. हॉस्पिटलच्या लाखो रुपयांच्या बिलामुळे बहुतेक कुटुंब हे कर्जबाजारी झाले आहेत. पतीच्या निधनानंतर अनेक महिलांनावर मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी पडली आहे.

कर्जमाफी करावी - महिलांसाठी असलेली संजय गांधी निराधार योजनाSanjay Gandhi Niradhar Yojana ,बाल संगोपन योजनेचे Child Care Plan पैसे महिलांच्या अकाउंट मध्ये जमा होत नाही. अशात महिलांचे गृह,वाहन व शेती कर्जाचे हप्ते आहेत त्यांचे हप्ते थकले आहे. बँकांनी त्यांचे अटक वॉरंट काढले आहे. त्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. या महिलांचे सरकारने कर्ज माफ करावे, तसेच नव्याने उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षण देण्यासह बिन व्याजी कर्ज द्यावे, तसेच विधवा महिलांचे सर्वेक्षण Demand for survey of widowed women पुनर्वसनाबाबत कृती आराखडा तयार करावा अशी मागणी आधार फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे, यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक विचार करू असं म्हटलं आहे..

कोरोनाने पती गमावलेल्या महिलांसमोर अनेक अडचणींचा डोंगर

बँकेने पैशासाठी तगादा लावला - माझ्या पतीने एका बँकेचे कर्ज काढले पण याची कल्पना मला नव्हती मला नव्हती,माझी एका एसआयपीची एक रक्कम माझ्या बँक अकाउंट वर आली, ती परस्पर बँकेने कर्ज मध्ये वळती केली,माझ्या पतीसोबत माझे सासरे,दीर यांचही कोरोनामुळे निधन झाले,त्यामुळे मला कुठलाही आधार नाही, 2012 नंतर कर्ज घेतल्यानंतर बँकेला संबंधित कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा इन्शुरन्स काढावा लागतो,तोही बँकेने काढला नाही,आता त्यांनी आमच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे


हेही वाचा - Kanhaiya Kumar visit to Nagpur एखाद दिवशी गडकरींचीही सीबीआय चौकशी होते की काय; काँग्रेस नेते कन्हैया कुमारांचे वक्तव्य

Last Updated :Aug 21, 2022, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.