ETV Bharat / city

Raksha Bandhan 2022 : लाडक्या भावाला राखी पाठवण्यासाठी पोस्टाची वॉटरप्रूफ पाकीट योजना

author img

By

Published : Aug 2, 2022, 12:45 PM IST

Raksha Bandhan 2022 : रक्षाबंधन निमित्त खास वॉटरप्रूफ पाकीट तयार करण्यात आले आहे. अवघ्या 10 रुपयात हे पाकीट उपलब्ध असून याला महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडिया व्हाट्सअपच्या काळात देखील पोस्टाने राख्या पाठवण्यासाठी भर दिला जात असतो. यंदा भाऊ- बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी पोस्ट विभागाने राखी पाठवण्यासाठी वॉटरप्रूफ पाकिटाची निर्मिती केली आहे.

Raksha Bandhan
Raksha Bandhan

नाशिक - पोस्ट खात्याकडून यंदा रक्षाबंधन निमित्त खास वॉटरप्रूफ पाकीट तयार करण्यात आले आहे. अवघ्या 10 रुपयात हे पाकीट उपलब्ध असून याला महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडिया व्हाट्सअपच्या काळात देखील पोस्टाने राख्या पाठवण्यासाठी भर दिला जात असतो. यंदा भाऊ- बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी पोस्ट विभागाने राखी पाठवण्यासाठी वॉटरप्रूफ पाकिटाची निर्मिती केली आहे. अवघ्या 10 रुपयात ही वॉटरप्रूफ पाकीट उपलब्ध असून याला महिला वर्गांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आजच्या व्हिडिओ कॉलच्या जगात जेव्हा राखी भावाला प्रत्यक्षात मिळते, तेव्हा त्यातील आनंद अधिक द्विगुणीत होत आहे.

Raksha Bandhan

वॉटरप्रूफ पाकीटला मोठा प्रतिसाद - यंदा पोस्ट खात्याकडून रक्षाबंधन निमित्त राख्या पाठवण्यासाठी खास वॉटरप्रूफ पाकीट तयार करण्यात आले आहे. याआधी राख्या पाठवताना साध्या पाकिटाचा वापर केला जात होता. अशात पावसामुळे राख्या खराब होणे किंवा त्याचे नुकसान होणार, अशा प्रकारच्या तक्रारी येत होते. त्यामुळे आता हा नवीन प्रयोग करण्यात आला असून याला महिला वर्गांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन दिवसात 1 हजार पाकिटाची विक्री नाशिक पोस्ट ऑफिसमध्ये झाली आहे. या राख्या देशासह- विदेशात पाठवण्यासाठी बहिणीची पसंती मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडावे, म्हणून केवळ 10 रुपयांमध्ये हे पाकीट उपलब्ध आहे, असे पोस्ट विभागाकडून सांगण्यात आले आहे.

राखी सुरक्षित पोहचेल - पोस्ट ऑफिसचा हा उपक्रम खूप छान आहे. सध्या पाकीटमध्ये भावाला राख्या पाठवत असतात, आता नव्याने आलेल्या वॉटरप्रूफ पाकिटात राख्या पाठवत आहे. हे वॉटरप्रूफ पाकीट अतिशय सुंदर आहे. त्यावर राखीचं चित्र देखील आहे. विशेष म्हणजे यामध्ये राखी पाठवल्यानंतर ती सुरक्षित भावापर्यंत पोहोचेल, याचा आनंद अधिक आहे, असे एका बहिणीने ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले आहे.

हेही वाचा - Mumbai University : 'विद्यार्थी संघटना शाहू महाराजांचे नाव देण्यावर ठाम', कुलगुरूंनी घेतली भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.