नाशिकमध्ये शहरातील टवाळखोरांना निर्भया पथकाचा दंडुका

author img

By

Published : Sep 17, 2021, 5:12 PM IST

निर्भया पथक

महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाकडून धडक कारवाई सुरू असून, शहरातील ब्लॅकस्पॉट, उद्यान स्थळ आणि चौकात घोळका करून बसणाऱ्या टवाळखोरांना दंडुक्याचा प्रसाद दिला जात आहे. या कारवाईने परिसरातील महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. ही कारवाई अशीच सुरू ठेवावी अशी मागणी महिलांकडून होत आहे.

नाशिक - नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता निर्भया पथकातील महिला पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. रस्त्याच्या बाजूला घोळका करून बसणाऱ्या टवाळखोरांना दंडुका बरसावला जात आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईचे शहरात कौतुक होत आहे.

टवाळखोरांना निर्भया पथकाचा दंडुका
महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाकडून धडक कारवाई सुरू असून, शहरातील ब्लॅकस्पॉट, उद्यान स्थळ आणि चौकात घोळका करून बसणाऱ्या टवाळखोरांना दंडुक्याचा प्रसाद दिला जात आहे. या कारवाईने परिसरातील महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. ही कारवाई अशीच सुरू ठेवावी अशी मागणी महिलांकडून होत आहे. महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी तेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत निर्भया पथके कार्यान्वित करण्यात आली आहे. या पथकात महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असून मोबाईल पेट्रोलिंग व्हॅनद्वारे परिसरातील शाळा, कॉलेज, बसस्थानके, बंद पडलेल्या इमारती, उद्याने, मोकळ्या पटांगणात चौकात गस्त केली जात आहे. या ठिकाणी टवाळखोर दिसल्यास त्यांना दंडुक्याच्या प्रसाद दिला जातं आहे.

महिला अत्याचार करणाऱ्यांची यादी
महिला विरोधात लैंगिक गुन्हे दाखल झालेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. या गुन्हेगारांवर नजर ठेवली जात आहे. तसेच संबंधित महिलांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत संबंधितावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त दीपक पांडये यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.