ETV Bharat / city

Hanuman Chalisa Row : मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त

author img

By

Published : May 4, 2022, 12:24 PM IST

Hanuman Chalisa Row
Hanuman Chalisa Row

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत अल्टिमेट दिल्यानंतर आता नाशिकमध्ये पोलीस यंत्रणा (Nashik Police Force) सज्ज झाली आहे.

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत अल्टिमेट दिल्यानंतर आता नाशिकमध्ये पोलीस यंत्रणा (Nashik Police Force) सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएस जवळील मनसेच्या राजगड (Nashik MNS office) कार्यालयाबाहेर पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केलाय.

पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त
कालपासून नाशिक शहरात ईद आणि अक्षय्य तृतीयाच्या (Akshay Tritiya 2022) निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे. मागील दोन वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच सामूहिकरित्या ईद साजरी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सीबीएस जवळील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून सामुहिक नमाज पठण करण्यात आले. त्यामुळे या खबरदारीचा उपाय म्हणून मैदानाजवळ असलेल्या मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मनसेची भूमिका स्पष्ट करणार
दीडशेहून अधिक मनसैनिकांना पोलिसांच्या नोटिसा मशिदीवरील भोंग्याप्रकरणी मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जवळपास दीडशे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत. त्यात काही पदाधिकारी भोंगे खरेदी करत असल्याची चर्चा आहे. यामुळे पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन नेमके काय करणार याची माहिती घेतल्याचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी सांगितले. नवीन पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे मनसेची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचेही दातीर यांनी म्हटलं.

हेही वाचा - Hanuman Chalisa Row : औरंगाबादेत मनसे कार्यकर्ते सापडेनात, पोलिसांच्या नोटीसीनंतर झाले 'नॉट रिचेबल'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.