ETV Bharat / city

दोन दिवसाच्या पावसात गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ, नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता

author img

By

Published : Jul 23, 2021, 3:45 PM IST

Updated : Jul 23, 2021, 4:01 PM IST

नाशिकच्या धरण समूह क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 58 टक्क्यांवर जाऊन पोहोचल्याने आता नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता
पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता

नाशिक - नाशिकच्या धरण समूह क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 58 टक्क्यांवर जाऊन पोहोचल्याने आता नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दोन दिवसाच्या पावसात गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ, नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता

दारणा, भावली, वालदेवी धरणातील पाणीसाठा देखील 70-90 टक्क्यांवर
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूह क्षेत्रामध्ये पावसाने दडी दिल्याने धरणातील पाणीसाठा 35 टक्क्यांपर्यंत खालावला होता. परिणामी नाशिक पाणिकपातीचा निर्णय ही प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून गंगापूर धरण समूह क्षेत्रांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अवघ्या दोन दिवसातच गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा 58 टक्‍क्‍यांवर जाऊन पोहोचला आहे. याचबरोबर दारणा भावली वालदेवी धरण देखील 70 ते 90 टक्‍क्‍यांपर्यंत भरल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र गुरुवारी सकाळपासून पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतली असून जिल्हाभरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आता गंगापूर धरण 58 टक्के भरल्याने नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील सध्या स्थितीत असलेला धरण पाणीसाठा
1) गंगापुर धरण 58 %
2) दारणा धरण 77 %
3) मुकणे धरण 40 %
4) भावली धरण 92.%
5)कश्यपी धरण 30 %
6) वालदेवी धरण 81%
7) आंळदी धरण 40 %
8 ) ओझरखेड धरण 26%
9) पालखेड धरण 32 %
10) चनकापुर धरण 13 %
11) नांदूर मध्यमेश्वर धरण 100%
12) वाघाड धरण 23 %

हेही वाचा - LANDSLIDE AT MAHAD : रायगडच्या महाडमध्ये दरड कोसळून आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

Last Updated : Jul 23, 2021, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.