ETV Bharat / city

अफगाणिस्तानातील तणावाचा परिणाम, नाशकात सुकामेव्याच्या दरात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ

author img

By

Published : Sep 1, 2021, 6:47 AM IST

Updated : Sep 1, 2021, 7:08 AM IST

In Nashik prices of dried fruits rose by 25 to 30 per cent
नाशकात सुकामेव्याचे भाव 25 ते 30 टक्क्यांनी वाढले

भारतात मोठ्या प्रमाणात सुकामेवा अफगाणिस्तानहून येत असल्याने, तेथील अस्थिर वातावरणामुळे मागणीच्या तुलनेत सुकामेव्याचा पुरवठा सध्या होत नाही. पुरवठा होत नसल्यामुळे सुकामेव्याच्या भावात 25 ते 35 टाक्यांनी वाढ झाली आहे. जर पुढील काही काळ अफगाणिस्तान मध्ये परिस्थिती अशीच राहिल्यास सुकामेव्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

नाशिक - अफगाणिस्तानवर तालिबानने आक्रमण केल्यामुळे तेथील परिस्थिती अस्थिर झाली असून त्यामुळे अफगाणिस्तान येथून आयात होणाऱ्या सुकामेव्यावर त्याचा परिमाण झाला आहे. सुकामेव्याच्या दरात 25 ते 30 टक्यांनी भाव वाढ झाली आहे.

नाशकात सुकामेव्याच्या दरात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ

अफगाणिस्तानवर तालिबानीने आक्रमण केल्यामुळे अफगाणिस्तानची उद्योग व्यवस्था कोलमडली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात सुकामेवा अफगाणिस्तानहून येत असल्याने, तेथील अस्थिर वातावरणामुळे मागणीच्या तुलनेत सुकामेव्याचा पुरवठा सध्या होत नाही. पुरवठा होत नसल्यामुळे सुकामेव्याच्या भावात 25 ते 35 टाक्यांनी वाढ झाली आहे. जर पुढील काही काळ अफगाणिस्तान मध्ये परिस्थिती अशीच राहिल्यास सुकामेव्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

सणासुदीला वाढले भाव
एकीकडे पेट्रोल, डिझेल, गॅस, तेलाचे भाव वाढत असताना आता सुकामेव्याचे भाव देखील वाढल्याने सर्वसामान्य व्यक्तीचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. त्यात आता गणपती, नवरात्र, दिवाळी सारखे मोठे सण येऊ घातले असून याकाळात जर सुकामेव्याचे भाव वाढले तर सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशाला कात्री बसणार आहे.

मुलांसाठी तरी खरेदी करावे लागते
सुकामेवाच्या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या मासिक खर्चावर झाला आहे. 'ईटीव्ही भारत'ने या दरवाढी संदर्भात एका गृहिणीची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्या म्हणाल्या, 'आमचं कुटुंब मोठं आहे, सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. घरातील लहान मुलांना आम्ही बाहेरील इतर पदार्थ देण्यापेक्षा पौष्टिक असलेला सुकामेवा देत असतो. मुलंही ते आवडीने खातात. आमच्या महिन्याच्या किराण्यात अंजीर, बदाम, किसमिस, काजू हा सुकामेवा हमखास असतो. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून सुकामेव्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.' मात्र असं असलं तरी मुलांच्या आवडीसाठी कमी प्रमाणात का होईना आम्ही सुकामेवा खरेदी केल्याचं भक्ती दिघोळे या गृहिणीने सांगितलं.
असे आहेत दर..

सुकामेवाआधीआता
बदाम 8001200
पिस्ता10001300
अंजीर10001400
किसमिस300400
काजू8001200
काली किसमिस400500
आक्रोट500700
Last Updated :Sep 1, 2021, 7:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.