Ganesh Chaturthi 2022: गोदावरीच्या राजाची मुंबईवारी; मनमाड कुर्ला एक्सप्रेस मध्ये गणरायाची स्थापना

author img

By

Published : Aug 31, 2022, 1:15 PM IST

Celebration In Manmad Kurla Godavari Express

ज्या गणरायाची संपूर्ण देशाला आतुरता असते त्या गणरायाची आज सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने स्थापना करण्यात येत आहे. तर मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये Manmad Kurla Godavari Express"गोदावरीच्या राजा" ची थाटात स्थापना Installation of Ganaraya in Manmad Kurla Express करण्यात आली असुन गेल्या 25 वर्षांपासून बाप्पा मनमाड मुंबई अप डाऊन करत आहे. यंदा हे 26 वे वर्ष असुन मनमाड ते मुंबई पर्यंत प्रवास करणाऱ्या चाकरमान्याची अपार श्रद्धा या गणपतीवर आहे.

मनमाड - मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये "गोदावरीच्या राजा" Manmad Kurla Godavari Express ची थाटात स्थापना Installation of Ganaraya in Manmad Kurla Express करण्यात आली असुन गेल्या 25 वर्षांपासून बाप्पा मनमाड मुंबई अप डाऊन करत आहे. यंदा हे 26 वे वर्ष असुन मनमाड ते मुंबई पर्यंत प्रवास करणाऱ्या चाकरमान्याची अपार श्रद्धा या गणपतीवर आहे. सर्वधर्मीय मिळुन या गणरायाची स्थापना करतात.मोठया थाटात आज गणरायाची स्थापना करण्यात आली.

ढोल ताश्याच्या गजरात श्रीगणेशाची स्थापना - ज्या गणरायाची संपूर्ण देशाला आतुरता असते त्या गणरायाची आज सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने स्थापना करण्यात येत आहे. सालाबादप्रमाणे याहीवर्षी मनमाड - कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमध्ये Manmad Kurla Godavari Express देखील गणरायाची स्थापना करण्यात आली. या गणपतीचे यंदाचे हे २६ वे वर्ष असुन मनमाडहून सुटणार्‍या मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये ढोल ताश्याच्या गजरात श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. रोजच्या अपडाऊन करणाऱ्यासह शहरातील नागरकीनी यावेळी मोठ्या संख्येने मनमाडरेल्वे स्थानकावर गणेश स्थापनेसाठी गर्दी केली होती. गेल्या २५ वर्षांपासून मनमाड ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई असा प्रवास करणारे सर्वधर्मीय चाकरमानी या गाडीत गणपतीची स्थापना मोठ्या उत्सहात करतात. यंदाही रात्री पासधारकांनी आर्कषक सजावट करत श्रीची स्थापना केली.

गोदावरीच्या राजाची मुंबईवारी; मनमाड कुर्ला एक्सप्रेस मध्ये गणरायाची स्थापना...

आरपीएफ इंस्पेक्टरची परवानगी देण्यासाठी टाळाटाळ गेल्या 25 वर्षांपासून गोदावरी एक्सप्रेस मध्ये या गणरायाची स्थापना करण्यात येते आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसुन रेल्वेच्या डीआरएम पासुन ते जनरल मॅनेजर पर्यंत कुणीही या गणरायाची स्थापना करण्यासाठी मज्जाव केला नाही. मात्र मनमाड रेल्वे आरपीएफ इन्स्पेक्टर ढेंगे यांनी केवळ मला न भेटता परवानगी घेतलीच कशी अशी विचारणा करत अध्यक्ष यांच्या नावाने नोटीस बजावत परवानगी देण्यास टाळाटाळ केली.

हेही वाचा Ganeshotsav 2022 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली गणेश चतुर्थी निमित्त शासकीय निवासस्थानी विधीवत पुजा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.