ETV Bharat / city

सावधान! कोरोना संबंधी मेल पाठवून हॅकर्स साधत आहेत संधी!

author img

By

Published : Mar 6, 2020, 3:01 PM IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने कोरोनाबाबत सावधानता बाळगण्याचे मेल पाठवत हॅकर्सकडून नागरिकांचे मोबाइल हॅक करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

corona in nashik
जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने कोरोनाबाबत सावधानता बाळगण्याचे मेल पाठवत हॅकर्सकडून नागरिकांचे मोबाइल हॅक करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

नाशिक - जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने कोरोनाबाबत सावधानता बाळगण्याचे मेल पाठवत हॅकर्सकडून नागरिकांचे मोबाइल हॅक करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. चीनसह जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून आता भारतातही रुग्ण आढळले आहेत. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांनी कोरोनाबाबत काय काळजी घ्यावी, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मात्र याचा गैरफायदा मोबाइल हॅकर्स घेत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने कोरोनाबाबत सावधानता बाळगण्याचे मेल पाठवत हॅकर्सकडून नागरिकांचे मोबाइल हॅक करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाखाली कोरोनाबाबत काळजी घेण्याचे बनावट मेल पाठवून त्यांनी नागरिकांचे मोबाइल हॅक केले आहेत. तसेच यामार्फत त्यांची वैयक्तिक माहिती चोरल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यातून नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे मत सायबर तज्ञांनी व्यक्त केले आहे.

संबंधित ई-मेल डब्ल्यूएचओ संघटनेच्या नावाखाली तयार करण्यात आला आहे. हा मेल उघडताच त्यामार्फत मोबाईल अथवा संगणकामध्ये ट्रोजन हॉर्स नावाचा व्हायरस शिरकाव करतो. यानंतर तो आपोआप डाउनलोड होतो. यामधून हॅकर्स मोबाइल डेटा हॅक करतात; आणि मोबाईल मधून होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवतात. या माध्यमातून व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, सर्व बँक पासवर्ड, फोन-पे, गुगल-पे, आदींबद्दल माहिती हॅकर्सकडे जाते. यामुळे अशा इ-मेल पासून सावध राहण्याची सूचना संगणत तज्ज्ञांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.