ETV Bharat / city

नाशकातील 10 हजार ज्येष्ठ नागरिकांनी घेतला मोफत बस प्रवासाचा आनंद

author img

By

Published : Sep 7, 2022, 4:07 PM IST

नाशिक 10 हजार जेष्ठ नागरिकांनी घेतला मोफत बस प्रवासाचा आनंद
नाशिक 10 हजार जेष्ठ नागरिकांनी घेतला मोफत बस प्रवासाचा आनंद

26 ऑगस्ट पासून अमृत ज्येष्ठ नागरिक योजना सुरुवात झाली नाशिक शहरातील मुंबईत नाका,ठक्कर बाजार आणि जुने बस स्थानक येथून मोफत प्रवास लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असल्याचे दिसून आलं. अनेकांनी त्र्यंबकेश्वर,पुणे,मुंबई, औरंगाबाद तसेच जिल्ह्यात मोफत प्रवासाचा आनंद घेतला. मोफत प्रवास लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे देखील एसटी मंडळाकडून सांगण्यात आले.

नाशिक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षावरील नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याची अमृत ज्येष्ठ नागरिक योजना राज्य शासनाने सुरू केली. या योजनेला ज्येष्ठांचा उदंड प्रतिसाद लाभला. एकट्या नाशिकमध्ये अवघ्या पाच दिवसात दहा हजार ज्येष्ठ नागरिकांनी बसमधून मोफत प्रवासाचा आनंद घेतलाय. विशेष म्हणजे प्रवास करणाऱ्यांमध्ये अर्ध तिकिटाची योजना असलेल्या 65 वर्षांवरील ज्येष्ठांपेक्षा 75 वयावरील ज्येष्ठांची संख्या अधिक आहे.



13 डेपोमध्ये योजनेचे लाभार्थी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी राज्य शासनाने अमृत ज्येष्ठ नागरिक योजनची घोषणा केली होती,पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला हिरवा कंदील दिला होता.यानंतर 26 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात प्रत्यक्ष योजनेला सुरुवात झाली,पहिल्या दिवसांपासून नाशिक मधील जेष्ठ नागरीकांनी योजनेला उदंड प्रतिसाद दिला. नाशिक जिल्ह्यातील 13 डेपोमध्ये योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात दिसून आले. अवघ्या पाच दिवसात तब्बल 10 हजार 700 ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला. तर 65 ते 75 वर्ष दरम्यान 50 टक्के तिकिटाचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या 80 हजार इतकी आहे.

या ठिकाणी अधिक प्रवास 26 ऑगस्ट पासून अमृत ज्येष्ठ नागरिक योजना सुरुवात झाली नाशिक शहरातील मुंबईत नाका,ठक्कर बाजार आणि जुने बस स्थानक येथून मोफत प्रवास लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असल्याचे दिसून आलं. अनेकांनी त्र्यंबकेश्वर,पुणे,मुंबई, औरंगाबाद तसेच जिल्ह्यात मोफत प्रवासाचा आनंद घेतला. मोफत प्रवास लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे देखील एसटी मंडळाकडून सांगण्यात आले.

वयाचा पुरावा 75 वर्षावरील ज्येष्ठांना वयाचा पुरावा म्हणून छायाचित्र असले कोणतेही ओळखपत्र त्यात पॅन कार्ड ,आधार कार्ड ,वोटिंग कार्ड ग्राह्य धरले जाते. ज्या ओळख पत्रात जन्मतारीख आणि छायाचित्र असेल असा पुरावा महत्त्वाचा मानला जातो. तसेच काही ज्येष्ठ नागरिकांकडे स्मार्ट कार्ड देखील असल्याने त्यांना या कार्डच्या माध्यमातूनही मोफत प्रवास करतात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.