ETV Bharat / city

जागतिक जल दिन : जलसंधारणासाठी पुन्हा 'जल ही जीवन'च्या चळवळीला गती देण्याची गरज!

author img

By

Published : Mar 22, 2022, 3:43 PM IST

जलसंधारणाच्या कामाकडे आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच ज्या पद्धतीने इतर क्षेत्र हळूहळू रुळावर येत गती पकडली आहे. त्याच पद्धतीने पाणी क्षेत्रातही काम होण्याची गरज आहे. 22 मार्च हा सर्वत्र जागतिक जल दिन (World Water Day ) मानला जाते, यानिमित्ताने महाराष्ट्र जल भूषण पुरस्कार ( Maharashtra Jal Bhushan Award ) प्राप्त तसेच जल अभ्यासक प्रवीण महाजन यांच्यांशी ईटीव्ही भारतने संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

World Water Day
जागतिक जल दिन

नागपूर - कोरोना महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना फटका बसला. मग यातून जलसंधारणाच्या कामे का होईना त्यालाही खीळ बसली आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामाकडे आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच ज्या पद्धतीने इतर क्षेत्र हळूहळू रुळावर येत गती पकडली आहे. त्याच पद्धतीने पाणी क्षेत्रातही काम होण्याची गरज आहे. 22 मार्च हा सर्वत्र जागतिक जल दिन मानला जाते, यानिमित्ताने महाराष्ट्र जल भूषण पुरस्कार ( Maharashtra Jal Bhushan Award ) प्राप्त तसेच जल अभ्यासक प्रवीण महाजन यांच्यांशी ईटीव्ही भारतने संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. तसेच वर्ध्याच्या वैद्यकीय जनजगृती मंचाच्यावतीने जलसंधारणाच्या कामाला आता पुन्हा पूर्वरत करण्यासाठी चळवळ सक्रिय करण्याची गरज असल्याचे डॉ. सचिन पावडे सांगतात.

जल अभ्यासक प्रवीण महाजन यांची प्रतिक्रिया

काही ठिकाणी "धरण उश्याला कोरडं घशाला" परिस्थिती -

कोरोना काळात घरात लॉकडाऊन असले, तरी पाऊस समाधानकारक झाल्याने पाणी टंचाई जाणवली नाही. पण पाणी टंचाई आज नाही असे नाही. कारण आजही महाराष्ट्रातील अनके जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मोठ्या प्रमाणात सिंचन क्षेत्रातील कामे रखडली आहे. यामुळेच धरण उशाला आणि कोरड घश्याला अशी परिस्थिती आहे. आज शहर असो की ग्रामीण भागात नियमित पाणी पुरवठा होऊ शकत नाही. धरणात पाणी साठा असला तरी त्याला शहर आणि ग्रामीण भागात ग्रामपंचयात स्तरावर पोहचण्यासाठी पाहिजे त्या यंत्रणा सक्षम नाही त्यामुळे ही परिस्थिती असल्याचे प्रविण महाजन म्हणालेत. धरणाच्या पाण्यात पहिला वाटा हा पिण्याच्या पाण्यासाठीच असतो. धरणापासून दोनशे तीनशे किलोमीटर अंतरावर पाईपलाईन टाकून ते पाणी तहानलेल्या जिवाणपर्यंत पोहच नसल्याने पाणी टंचाईला समोर जावे लागते. त्यामुळे पाणी पोहचवणाऱ्या यंत्रणा सक्षम झाल्यास याच फायदा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काही प्रमाणात नक्कीच होऊ शकतो. पाणी फाऊंडेशन प्रमाणे अनेक संस्था काम करत आहेत. या संस्थांना सोबत घेऊन जल विभागाने काम केल्यास या चळवळीला आणखी मोठं स्वरूप प्राप्त होऊन चळवळ उभी राहू शकेल असे प्रविण महाजन सांगतात.

Jal Hi Jeevan Mishan
जलसंधारणाचे काम करताना नागरिक

पाणी फाउंडेशनच्याच्या माध्यमातून चळवळ उभी राहिली -

प्रसिद्ध अभिनेता अमीर खान ( Famous actor Aamir Khan ) यांच्या पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गाव खेड्यात पाणी जमिनीत मूरवण्यासाठी चळवळ उभी राहिली. लाखो लिटर पाणी जमिनीत मूरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामेही झाली. यातच वर्ध्याच्या वैद्यकीय जनजागृती मंचाच्या वतीने डॉक्टरांनी शारीरिक रोग्याबरोवर पाणी टंचाई दूर करण्यासाठी जमिनीवर उपचार करायला सुरुवात केली. शहरातील चळवळ ग्रामीण भागात रुजवण्यासाठी स्वतः कुदळ पावडे घेऊन गावकऱ्यांमध्ये जाऊन कामे केली. श्रमदानातून जमिनीवर पडलेला घाम पावसाळ्यात पाणी पातळीत वाढ होण्यास फायद्याचा ठरला. तसेच शहरात काम करण्यासाठी पावसाळ्याचे पाणी जमीमित सोडण्यासाठी एक मोहीमही राबविला.

थेट बोअरवेलच्या माध्यमातून लाखो लिटर पाणी भूगर्भात सोडले -

शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बोरवेलच्या माध्यमातून जमिनीच्या पोटातून हजारो लिटर पाण्याचा उपसा केला जातो. पण थेंबभर पाणी मात्र जमिनीत सोडत नसल्याची खंत वैद्यकीय जनजागृती मंचाचे डॉ. सचिन पावडे यांच्या मनात सलत होती. यासाठीच पावसाचे पाणी जमिनीत कसे सोडता येईल म्हणून एक यंत्र बनवले. या यंत्राचे पेटंट मिळवले आणि त्यानंतर या मोहिमेला सुरुवात झाली. वर्धा शहरासह अनेक जिल्ह्यांमध्ये सेमिनार घेऊन जनजागृती मोहीम राबवत पावसाचे पाणी थेट बोरवेल मध्ये सोडण्याच्या मोहिम उभी राहली. मागील दोन वर्षात कामे झाली नसली तरी जवळपास 1200 घरांवर हे यंत्र नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर लावून लाखो लिटर पाणी थेट 200 ते 300 फूट खाली जमिनीत सोडले. हेच पाणी नैसर्गिक पद्धतीने इतक्या खोलीवर जाण्यासाठी शेकडो वर्ष निघून जातात. साधारण 1 हजार चौरसफूट टेरेसवर पडणारा सरासरी पाऊस पाहता 90 हजार लिटर पाणी जमिनीत सोडले जाते. यावरून याची व्याप्ती लक्षात घेऊन पुन्हा याच पद्धतीची चळवळ सुरू करण्याची गरज असल्याचेही सचिन पावडे सांगतात.

हेही वाचा - House On Fire In Solapur : पत्नीशी भांडण झाल्यानंतर पेटवले स्वत:चे घर; शेजाऱ्यांची पोलिसांत धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.