ETV Bharat / city

जागतिक मानसिक आरोग्य दिन : मानसिक आरोग्यात झोपेला अधिक महत्व;...अशी घ्या शांत झोप

author img

By

Published : Oct 10, 2021, 8:34 AM IST

Updated : Oct 10, 2021, 11:26 AM IST

कोरोनामुळे आपण अनेक आव्हानांना समोर जात आहे. यातच यंदाची थीम म्हणजे 'मेंटलं हेल्थ इन अन इक्वल वर्ल्ड', ही आहे. यंदा आपण कोरोनाच्या काळात जे अनुभवलं त्यामध्ये प्रगत देशात कोरोनाशी लढताना संसाधन उपलब्ध होती. तेच काही देश उपचाराची सोयीसुविधा कमी पडल्याने अनेकांचे जीव गेल्याचे भयावह चित्र या काळात पाहायला मिळाले.

जागतिक मानसिक आरोग्य दिन
जागतिक मानसिक आरोग्य दिन

नागपूर - ताण-तणाव आणि नैराश्य हे शब्द आपल्या कानावर नेहमी पडत असतात पण हा मानसिक आजार आहे. बहुदा हा आजार आपल्याला झाला आहे असे लक्षात येत नाही. त्यामुळे दरवर्षी 10 ऑक्‍टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करत मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करण्याचे काम जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे. यासंदर्भातच नागपूरचे मानसोपचार तज्ञ डॉ. निखिल पांडे यांच्याशी चर्चा केली आहे. मानसिक आजारला दूर सारून कसे आनंदी राहू शकतो, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

मानसिक आरोग्यात झोपेला अधिक महत्व

कोरोनामुळे आपण अनेक आव्हानांना समोर जात आहे. यातच यंदाची थीम म्हणजे 'मेंटलं हेल्थ इन अन इक्वल वर्ल्ड', ही आहे. यंदा आपण कोरोनाच्या काळात जे अनुभवलं त्यामध्ये प्रगत देशात कोरोनाशी लढताना संसाधन उपलब्ध होती. तेच काही देश उपचाराची सोयीसुविधा कमी पडल्याने अनेकांचे जीव गेल्याचे भयावह चित्र या काळात पाहायला मिळाले. हे सगळं घडत असतांना त्या देशाची आर्थिक समस्या प्रामुख्याने पुढे आली. आर्थिक विषमतेमुळे अनेक देशात भेदभाव पाहायला मिळाला, कुठे महिला पुरुष, कामगार-अधिकारी त्यामुळे यंदाची थीम सर्वाना उपचार मिळावे म्हणून मेंटल हेल्थ इन अन इकवल वर्ल्ड यावर आधारित सर्वांना उपचार मिळणे ही थीम ठरवली आहे.

बदलते जीवनमान आणि कोरोना महामारीचा मानसिक आरोग्यावर परिणाम -

यात मागील काही वर्षांत बदलते जीवनमान आणि कामाची पद्धती यामुळे मानसिक आरोग्याचे रुग्ण आज मोठ्या संख्यने वेढलेले पाहायला मिळत आहे. ताण-तणाव, चिडचिड, राग, झोप न येणे यासारख्या प्रमुख कारणे मानसिक आजाराला बळी पडताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या महामारीत बऱ्याच कुटुंबीयांनी जवळच्या स्वकीयांना कुठलीच मदत न करू शकल्याने मृत्यूच्या दाढेत जातांना पाहिले. यातुन जो धक्का त्यांना सोसावा लागला त्यामधून अनेक लोक कित्येक महिन्यानंतर बाहेर पडू शकले नाही. त्यामुळे मानसिक आजाराने त्यांना जखडले आहे. यातून नैराश्य आले आहे. आज सर्वाधिक फटका रोजगाराच्या संदर्भात असो की आर्थिक प्रगतीच्या संधी गमावल्यामुळे मानसिक आरोग्याचे शिकार होत आहे.

मानिसक आरोग्यात झोपेला अधिक महत्व...अशी घ्या शांत झोप...

शारीरिक आजारात जसे दुखणे असते त्याच पद्धतीने मानसिक आजार असल्याचे पहिले लक्षण म्हणजे झोप जाणे. कारण मानसिक आजारात झोपेला विशेष महत्व असल्याने पहिला परिणाम हा झोपेवर दिसून येत असल्याचे डॉ. निखिल पांडे सांगतात. त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी सर्वात पहिले म्हणजे डोक्यात कुठले विचार नसावे, झोपण्यापूर्वी मोबाईल टीव्ही यापासून दूर राहावे, वाटत असल्यास चांगले पुस्तक किंवा शांत संगीत कानावर पडू द्या त्याचा अधिक फायदा होईल. तसेच दुपारच्यावेळी झोपल्याने त्याचा परिणाम संध्याकाळच्या वेळी होणार असेल ते आपल्या शरीराप्रमाणे ठाऊक घ्यावे, किमान 45 मिनिटं व्यायाम करावा. काहींना सायकांळी व्यायाम करायला आवडे. त्यामुळे त्यांनी करावा, पण जर त्यामुळे तुम्हाला अधिक फ्रेश वाटून झोप लांब पडणार असले तर तो व्यायाम टाळावा असेही मानसोपचार तज्ञ पांडे सांगतात.

मेंटलचा अर्थ -

आज मेंटल म्हणजे पागल असा समज आहे. मेंटल या शब्दाचा अर्थ हा मानसिक आहे. कारण शरीर आजारी पडते तसे कधीतरी आपले मनही काही बाबी दुखवल्याने आजारी होते. त्यामुळे मानसिक आरोग्य आणि त्या संदर्भात स्वतःला काही कळत नसले तरी त्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीने ते बदल टिपले पाहिजे. त्यामुळे त्याना मानसोपचार तज्ञ म्हणजे पागल झाल्याने डॉक्टरकडे जावे लागत आहे असे नसून हा न्यूनगंड किंवा चुकीची भावना डोक्यातून काढुन टाकली पाहिजे. काम कमी होत आहे का, कामाच्या गुणवत्ता घसरली आहे का, हे लक्षात आल्यास त्यावर मानसिक उपचार पद्धतीचा फायदा घेऊन पुरवत होता येऊ शकते.

महिलांमध्ये छुप्या पद्धतीचे नैराश्य असू शकतात....

महिलांमध्ये आपल्या कायम स्वरूपी तक्रार शारिरीक दुखण्याच्या तक्रारी असतात. त्यावर उपचार घेऊन त्यांना बरे वाटत नाही, काही एखादे दुखणे बसले तर दुसरे दुखावणे उद्भवतात. त्यामुळे त्यांना झोप न येणे, सकाळी लवकर जाग यायाल लागणे, यासारखे बदल असल्यास छुप्या पद्धतीचे नैराश्याने त्यांना ग्रासले असू शकतात. त्यामुळे घरातील लोकांनी महिलांची घरी राहते म्हणून दुर्लक्ष न करता योग्य काळजी घेण्याची गरज आहे.

"दुवा के साथ दवा भी करो"

बरेचदा सर्व वैद्यकीय चाचण्या या निगेटिव्ह येतात. उपचार करून औषध लागत नाही. तेव्हा अंधश्रद्धाळू पद्धतीने बुवाबाजी यांच्याकडे जाऊन उपचार घेतात. त्यावेळी त्यांना मानसिक आधार असतो. पण आजकाल बुवा बाब सुद्धा 'दुवा कर रहा हु, दवा भी करो' अस म्हणायला लागले. पण लोक मात्र याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मानसिक आजाराचा उपचार करणारे डॉक्टर असतात. हे त्यांना माहितच नाही. यासाठीच मानसिक आरोग्या बद्दल जनजागृतीचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेतलेले आहे. भूतबाधा आणि यासारख्या अन्य बाबींना बळी पडण्यापेक्षा मानसिक आरोग्य तापासून घेतले पाहिजे.

माईंडसेट बदला आणि वास्तविकता स्वीकारून आनंदी आयुष्य जगा -

गेल्या काळात मानसिक आजाराचे रुग्ण वाढत आहे. वेडेपणाचे रुग्णसंख्या ही स्थिर आहे. काही लोक हे भीतीपिटी कोणासमोर व्यक्त होत नाही त्यामुळे ते सोशल माध्यमाचा वापर करतात. त्यावर व्यक्त होतात. पण त्यामुळे ते आहारी जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यात एकलकोंडेपणा, नैराश्य याचे प्रमाण अधिक आहे. यापासून बचाव करायचा असेल तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको, स्क्रीन मोबाईल या गोष्टींचा अतिरेक टाळला पाहिजे. तंबाखू, दारू पिणे या सवयी टाळाव्यात. नकारात्मक लोकांपासून दूर राहावे. वास्तव जीवनापासून खूप जास्त अपेक्षा करणे, त्या पूर्ण न होणे यामुळे सुद्धा अनेक गोष्टींची अडचण पाहायला मिळते. यासाठी साधा उपाय म्हणजे मानसिक आरोग्यासाठी आनंदी राहणे, काही बाबतीत वास्तव स्वीकारणे माईंडसेट बदलवत चांगले रुटीन ठेवून आपण आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकतो सोबतच मानसिक आरोग्यपासून दूर राहण्यास मदत होईल हे नक्की.

Last Updated :Oct 10, 2021, 11:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.