ETV Bharat / city

Two Lakh Rakhis For Soldiers : प्रहार समाज जागृती संस्थेच्या माध्यमातून सीमेवर तैनात असलेल्या जवानांना पाठवल्या दोन लाख राख्या

author img

By

Published : Jul 31, 2022, 2:10 PM IST

राखी सणानिमित्ताने ( Rakhi for soldiers ) सेना जवानांच्या उपकाराची जाणीव म्हणून नागपुरातील प्रहार संस्थेच्या वतीने प्रहार शाळेच्या विद्यार्थ्यांनी ( Prahar School students Rakhi for Soldiers ) सीमेवर तैनात भारतीय जवानांसाठी दोन लाख राख्या तयार केल्या आहेत. या राख्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना पाठवल्या आल्या आहेत.

Rakhi for Soldiers initiative
राखी फॉर सोल्जर उगक्रम

नागपूर: नागपूर येथील प्रहार समाज जागृती संस्थेच्या माध्यमातून प्रहार ( Prahar Sanstha's Rakhi initiative for soldiers ) शाळेच्या विद्यार्थ्यांनी सीमेवर तैनात भारतीय जवानांसाठी दोन लाख राख्या ( Two lakh Rakhis sent to soldiers ) तयार केल्या आहेत. या राख्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना पाठवल्या आल्या आहेत. ( Prahar School students activity Rakhi for Soldiers ) प्रहार कडून आयोजित एका कार्यक्रमात आर्मी पोस्टल सर्व्हिसेसचे लेफ्टनंट मणीकंदन यांच्याकडे दोन लाख राख्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

Handing over Rakhi to Lt Manikandan
लेफ्टनंट मणीकंदन यांना राख्या सोपविताना प्रहारच्या सदस्या

राखी निर्मितीला विद्यार्थ्यी, सामाजिक संघटनांचा प्रतिसाद - आपण सर्व सण उत्सव अगदी सुरक्षितपणे साजरे करतो; परंतु सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करणारा जवान कुटुंबासह कोणताही सण साजरे करू शकत नाहीत. देश सेवेसाठी सीमेवर तैनात असलेले जवान जीवाची पर्वा न करता लढा देत असतात. म्हणूनच गेल्या २५ वर्षांपासून प्रहार समाज जागृती संस्थेच्या माध्यमातून देशातील विविध सीमांवर तैनात जवानांसाठी राख्या पाठविल्या जातात. यंदा 'आझादी का अमृत महोत्सव' असल्यामुळे 75 हजार राख्या पाठविण्यात येणार होत्या; परंतु संस्थेच्या आवाहनाला शहरातील सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय यांनी मोठा प्रतिसाद दिला आणि 2 लाख राख्या तयार झाल्या आहेत.

Rakhis made by students of Prahar School
प्रहार शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या


२ लाख राख्या सैन्याच्या स्वाधीन- विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या २ लाख राख्या या सेनेच्या नॉर्थन सेक्टर, जम्मू काश्मीर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब, तसेच ज्या सीमेवर सेनेचे जवान तैनात आहेत तिकडे या राख्या आर्मी पोस्टल सर्व्हिसेसच्या माध्यमातून जवानांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.

हेही वाचा - Arvind Sawant On ED Action : संजय राऊतांवरील ईडीची कारवाई सुडाची,भाजपशी जुळवून घेण्यासाठी दबाव - अरविंद सावंत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.