ETV Bharat / city

NAXALITES MOVEMENT मिलिंद तेलतुंबडेच्या खात्म्यानंतर शहरी नक्षलवाद समर्थकांचे चेहरे उघड होण्याची शक्यता

author img

By

Published : Nov 16, 2021, 3:54 PM IST

Updated : Nov 16, 2021, 4:09 PM IST

गेल्या काही वर्षात गडचिरोलीमधील नक्षलवादी चळवळ कमकुवत झाली. त्यानंतर चळवळीला बळकटी देण्यासाठी मिलिंद तेलतुंबडे प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या चळवळीला मोठी खीळ बसली असल्याचे मत नक्षलवादी चळवळीचे अभ्यास दत्त शिर्के यांनी व्यक्त केले आहे.

जनसंघर्ष संस्थेचे संचालक दत्त शिर्के
जनसंघर्ष संस्थेचे संचालक दत्त शिर्के

नागपूर - दोन दिवसांपूर्वी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने तब्बल २६ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांच्या चकमकीत नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे हादेखील मारला गेल्याने नक्षली चळवळीला खीळ बसेल का, याबाबत विविध मते व्यक्त होत आहेत. या संदर्भात नक्षल चळवळीचे अभ्यासक आणि जनसंघर्ष संस्थेचे संचालक दत्त शिर्के यांनी यासह विविध प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

मिलिंद तेलतुंबडे याच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीमध्ये नक्षलवादी चळवळ मोठी झाली होती. त्याच्याकडे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यात नक्षलवादी चळवळ मोठी करण्याची जबाबदारी होती. एवढेच नाही तर दोन वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंडदेखील तोच होता. त्यामध्ये १७ जवानांना हुतात्मा झाले. त्यामुळे पोलिसांच्या चकमकीत तेलतुंबडेचा झालेला खात्मा हा पोलिसांचा खूप मोठा विजय असल्याचे मत नक्षल चळवळीचे अभ्यासक दत्त शिर्के यांनी व्यक्त केले आहे.

शहरी नक्षलवाद समर्थकांचे चेहरे उघड होण्याची शक्यता

हेही वाचा-Naxals killed in Gadchiroli : चकमकीत 20 पुरुष तर 6 महिला नक्षली ठार; अधिकृत माहिती समोर

नक्षलवादी चळवळीचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडेचा जंगलात आणि ग्रामीण भागातील वावर हा सहज होता. तो सह्याद्री आणि दीपक नावाने प्रसिद्ध होता. मिलिंद तेलतुंबडेने कोळसा खाणीतील कामगार नेता ते नक्षलवादी चळवळीचा प्रमुख होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता. अफाट नेतृत्व क्षमता असल्याने तरुण वर्ग त्याच्याकडे आकर्षित होत होता. मात्र, गेल्या काही वर्षात गडचिरोलीमधील नक्षलवादी चळवळ कमकुवत झाली. त्यानंतर चळवळीला बळकटी देण्यासाठी मिलिंद तेलतुंबडे प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या चळवळीला मोठी खीळ बसली असल्याचे (Naxal Movement in Gadchiroli after death of Milind Teltumbde) मत नक्षलवादी चळवळीचे अभ्यास दत्त शिर्के यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा-आगामी काळात नक्षलवाद कायमचा संपेल- पोलीस महासंचालक हेमंत नगराळे

शहरी नक्षलवाद समर्थक बेनकाब होतील

नक्षलवादी सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे हा जंगलातील लढाई अनेक वर्षांपासून लढत होता. गडचिरोली जिल्ह्यात नेटवर्क तयार करण्यासोबतच शहरातदेखील नक्षलवाद समर्थकांची फळी तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. गेल्या काही वर्षांमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत या संदर्भातील खुलासा झाला आहे. पोलिसांच्या कारवाई दरम्यान अनेक साहित्य पोलिसांच्या हाती लागले असल्याची शक्यता आहे. त्यामध्ये मिलिंद तेलतुंबडे याची डायरीदेखील असण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या हाती ती डायरी लागली असेल तर अनेक प्रश्नांचे खुलासे होण्याची शक्यता आहे. मिलिंद तेलतुंबडे याचे कुणासोबत संबंध (urban Naxal supporters) होते? कुणासोबत आर्थिक व्यवहार झाले? शहरातील कुणासोबत तो डील करत होता? अशा अनेक प्रश्नांची माहिती मिळेल, त्यातूनच शहरी नक्षलवाद समर्थक बेनकाब होइल, अशी माहिती जनसंघर्ष संस्थेचे दत्त शिर्के यांनी दिली आहे.

हेही वाचा-नक्षली हल्ला : 'लढाई आता निर्णायक वळणावर, नक्षलवाद मुळापासून संपवणार'

जवानांबरोबर झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे ठार-

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्याच्या मरदिनटोला जंगल परिसरात शनिवारी झालेल्या चकमकीत (encounter in Gadchiroli) 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात (Naxals killed) गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवानांना 14 नोव्हेंबरला यश आले. या चकमकीत नक्षलवाद्यांचा देशातील सर्वात मोठा नेता, 50 लाखाचे बक्षीस असलेला मिलिंद तेलतुंबडे (encounter of Milind Teltumbde) याच्यासह 20 लाखांचे बक्षीस असलेला डीव्हीसीएम कमांडर लोकेश उर्फ मंगू पोडयाम/ मडकाम व 16 लाखांचे बक्षीस असणारा डीव्हीसीएम महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा हे ठार झाले. या चकमकीत 20 पुरुष तर 6 महिला नक्षली ठार झाले आहेत.

Last Updated :Nov 16, 2021, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.