ETV Bharat / city

Minor Girl Suicide In Mumbai : आईने रागवाल्यामुळे अल्पवयीन मुलीची 16 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

author img

By

Published : Jun 11, 2022, 3:39 PM IST

Minor Girl Suicide In Mumbai
Minor Girl Suicide In Mumbai

नागपाडा परिसरातील एका 16 वर्षीय नाबालिक मुलीने ( Minor Girl Suicide ) बुधवारी (दि.08) रोजी रात्री इमारतीच्या 16 व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली आहे. घर मालकाचे पैसे चोरी केल्याने तिला तिच्या आईने रागावल्यानंतर तिला दोषी वाटत असल्याने तिने किचनच्या बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केली.

मुंबई - नागपाडा परिसरातील एका 16 वर्षीय नाबालिक मुलीने ( Minor Girl Suicide ) बुधवारी (दि.08) रोजी रात्री इमारतीच्या 16 व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली आहे. घर मालकाचे पैसे चोरी केल्याने तिला तिच्या आईने रागावल्यानंतर तिला दोषी वाटत असल्याने तिने किचनच्या बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणात अल्पवयीन मुलीला घरकाम करण्यासाठी ठेवल्यामुळे घर मालका विरोधात सुद्धा नागपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

किचनच्या बाल्कनीतून मारली उडी - नागपाडामध्ये एका बिल्डींगमध्ये घर काम करणारे अल्पवयीन मुलीने तिच्या घरमालकाच्या वॉलेटमधून 35 हजार रुपये चोरल्याचा आरोप होता. घरमालकाच्या घरून पैसे चोरी गेले असल्याची माहिती तिच्या आईला मिळाल्यानंतर आईने बॅग तपासली असता. त्यामध्ये घर मालकाचे वॉलेट सापडले. त्यानंतर आईने मुलीला रागावल्यानंतर तिने किचनमधल्या बाल्कनीत जाऊन खाली उडी मारल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी ही आत्महत्या केलेली मुलगी कुटुंबासह कोलकात्याला जात होती. त्यानुसार तिची आई तिला तिच्या मालकाच्या घरून आणण्यासाठी गेली असता त्याच सुमारास मालकाच्या मुलीची पर्स गायब झाली. जेव्हा ती पर्स सापडली तेव्हा ती मुलीच्या बॅगमध्ये होती. असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

मालकाविरोधातही गुन्हा दाखल - मुलीची आई घटनास्थळी हजर होती म्हणून घरमालकाने तिला माहिती दिली. यावर मुलीच्या आईने तिच्या चुकीच्या कृत्याबद्दल तिला फटकारले. त्यानंतर मुलगी पाणी पिण्याच्या बहाण्याने स्वयंपाकघरात गेली आणि त्यानंतर तिने बाल्कनीतून उडी मारली. तिचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. नागपाडा पोलिसांनी काझीच्या घर मालकावर आणि त्याच्या पत्नीवर बालकामगार कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत 16 वर्षांच्या मुलीला त्यांच्या घरी काम करून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - Rajyasabha Election Result : 'राज्यसभा तो झाकी है, विधानपरिषद अभी बाकी है', विजयानंतर धनंजय महाडिकांची पहिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.