ETV Bharat / city

Sudhir Mungatiwar Reply To Sanjay Raut :'देवेंद्र फडणवीस जनतेतून निवडून आलेत, त्यांना सल्ला देण्याची गरज नाही'

author img

By

Published : Apr 7, 2022, 5:34 PM IST

राज्यात सध्या संजय राऊत आणि किरीट सोमैया ( Sanjay Raut Vs Kirit Somaiya ) यांच्यात आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ( Devendra Fadnavis ) सोमैयांची वकिली करू नये, असा टोला संजय राऊत ( Sanjay Raut Alligation On Kirit Somaiya ) यांनी लगावला होता. त्याला सुधीर मुंनगटीवर ( Sudhir Mungatiwar Reply To Sanjay Raut ) यांनी उत्तर दिले आहे.

Sanjay Raut Alligation On Kirit Somaiya
Sanjay Raut Alligation On Kirit Somaiya

नागपूर - राज्यात सध्या संजय राऊत आणि किरीट सोमैया ( Sanjay Raut Vs Kirit Somaiya ) यांच्यात आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ( Devendra Fadnavis ) सोमैयांची वकिली करू नये, असा टोला संजय राऊत ( Sanjay Raut Alligation On Kirit Somaiya ) यांनी लगावला होता. त्याला सुधीर मुंनगटीवर ( Sudhir Mungatiwar Reply To Sanjay Raut ) यांनी उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस हे जनतेतून निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांना सल्ला देण्याची गरज नाही, असे मुंनगटीवार म्हणाले.

प्रतिक्रिया

काय म्हणाले सुधीर मुंनगटीवार - देवेंद्र फडणवीस हे जनतेतून निवडून आले आहेत. त्यांची बॅकडोर एंट्री नाही. ते जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले आहेत. त्यामुळे फडणवीसांना कोणीही सल्ला देऊ नये, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. तसेच कोण हिंदुत्ववादी आणि कोण हिंदुत्वाच्या विरोधात आहे, देशावर प्रेम करणारे आहे हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणीस यांना सल्ला किंवा सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही, असा पलटवारही त्यांनी केला.

'तर आंदोलन करायची गरज नसती' - पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेवरही टीका केली. 'चौकाचौकात जनतेच्या समस्या घेऊन आंदोलन केल्यापेक्षा जनतेसाठी आंदोलन केले असते, तर शिवसेनेचा जनाधार वाढला असता. न्याय मागायचा असेल तर न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून न्याय घ्यावा. आंदोलन करायची गरज नाही. पण विदर्भाची जनता याची नोंद घेईल आणि योग्य वेळी हिशोब करेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

'मातोश्रीवर झालेल्या आरोपांचा खुलासा केला का?' - संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांच्या नावावर पैसे मागितल्याचा आरोपी सोमैयांवर केला आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, 'सोमैया यांनी या आरोपांची उत्तरं दिली आहे. मात्र, मातोश्रीवर झालेल्या आरोपांचा खुलासा केला का? सगळा पोरकटपणा आहे. त्यामुळे जनतेचे मुद्दे बाजूला पडत आहे'

हेही वाचा - Azaan loudspeaker controversy : दोन मिनिटांच्या अजानसाठी मशिदींवरील लाऊडस्पीकरचा वाद उकरणे निरर्थक- मोहम्मद हाफीझुर रहेमान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.