ETV Bharat / city

Nagpur Corona : उपराजधानीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी विशेष तयारी, जाणून घ्या..

author img

By

Published : Jan 2, 2022, 7:32 PM IST

Nagpur Corona Update
Nagpur Corona Update

कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरीएंटच्या ( Nagpur Municipal Corporation Precaution for Omicron ) पार्श्वभूमीवर उपाययोजना राबवायला सुरवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्याच्या घडीला मोजकेच रुग्ण ( Nagpur Corona Patient ) असल्याने आमदार निवासाच्या इमारत ( MLA Hostel Covid Center ) क्रमांक दोनमध्ये कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील इतर कोविड सेंटर सध्या कार्यरत नसले, तरी रुग्ण वाढल्यास हे सेंटर तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपूर - जिल्ह्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरीएंटच्या ( Nagpur Municipal Corporation Precaution for Omicron ) पार्श्वभूमीवर उपाययोजना राबवायला सुरवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्याच्या घडीला मोजकेच रुग्ण ( Nagpur Corona Patient ) असल्याने आमदार निवासाच्या इमारत ( MLA Hostel Covid Center ) क्रमांक दोनमध्ये कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील इतर कोविड सेंटर सध्या कार्यरत नसले, तरी रुग्ण वाढल्यास हे सेंटर तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रिपोर्ट

सद्यस्थितीत नागपुरात 321 रुग्ण कोरोना -

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. दररोज सहा ते सात हजार जणांना कोरोनाची बाधा असल्याचे समोर येत होते. त्यामुळे शहरातील सर्वच भागत कोविड सेंटर उभारण्यात आले होते. सध्याच्या घडीला नागपूर जिल्ह्यात 321 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यातील बरेच रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपाचर घेत आहेत. तेच 40 ते 50 रुग्ण हे आमदार निवासात तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी डॉक्टरांची चम्मू असून जर रुग्णांना गरज पडल्यास तत्काळ उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासोबत गरज पडल्यास रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध आहे.

रुग्णसंख्या वाढल्यास इतर कोविड सेंटर पुन्हा सुरू -

नागपूर जिल्ह्यात ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांना याच आमदार निवसातील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. तर ओमायक्रॉनची बाधा झालेल्या सहा रुग्णांना मिहानमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. यासोबत बाहेर देशातून विमानाने आलेल्या रुग्णांना संशयित असल्यास याठिकाणी ठेवण्यात येत आहे. प्राथमिक स्तरावर 400 बेड हे ओमायक्रॉन रुग्णासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास इतर कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

200 मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजन वाढवण्याचे नियोजन -

शहरात दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण हे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय दाखल केले जात होते. याठिकाणी जवळपास 900 बेडसाठी 3 हजार एलपीएम आणि 2 हजार एलपीएम असे दोन मोठे ऑक्सिजन टॅंक उभारण्यात आले आहे. इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात उपचारासाठी जवळपास 600 बेड उपलब्ध करून देत ऑक्सिजन प्लँट सुद्धा उभारण्यात आला आहे. तसेच या दोन्ही रुग्णालयात ऑक्सिजन साठवणूक करण्यासाठी बेड आणि रुग्णसंख्येनुसार ऑक्सिजन टॅंकचे नियोजन करण्यात आले आहेत. यासोबत एम्स हॉस्पिटलमध्ये दोन ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आलेले आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयात ऑक्सिजन 125 मेट्रिक टनाचे ऑक्सिन टॅन्क लावण्यात आला आहे. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत जवळपास 160 ते 170 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज दररोज लागत होती. यात तुटवडा निर्माण झाला असताना बाहेर राज्यातून सुद्धा ऑक्सिजन आणावे लागले आहे. पण तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने 200 मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजन निर्माण क्षमता वाढवण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. यासोबत जम्बो सिलेंडर खरेदी करण्यात आले आहे. तसेच ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यात काही काम पूर्ण होणे बाकी आहे. तसेच शहरातील मनपाच्या काही रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती केंद्र लावण्यात आले आहे.

असे असणार या औषधीचे नियोजन -

नागपूर जिल्ह्यासह मोठ्या प्रमाणात रुग्ण हे बाहेर जिल्ह्यातून येतात. त्यामुळे वाढीव रुग्णसंख्येनुसार त्यांना लागणारा औषधसाठा उपलब्ध व्हावा, यासाठी सुद्धा नियोजन करण्यात आलेले आहे. गरजेनुसार प्रशासनाकडून वेळोवेळी आढावा घेऊन नियोजन तसेच वाढती रुग्णसंख्येच्या अनुषंगाने पाऊले उचलले जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे.

हेही वाचा - Haridwar hate speech case : धर्म संसद द्वेषपूर्ण भाषण प्रकरणाच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय SIT स्थापन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.